पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. इतिहासावरून पाहतां राष्ट्रांच्या प्रगतीमध्ये, प्रथम एकसत्ताक स्वतंत्र राजसत्ता व नंतर प्रजासत्ताक तिच्यामागून नियमितजनसत्ताक राज्यव्यवस्था, अशा प्रकारचा राजकीय चक्रनेमिक्रम असल्याचे दृष्टीस पडते. या प्रत्येकीमध्ये काही ना काही दोष व वैगुण्य असणारच. वरीलपैकी कोणत्या प्रकारची राज्यव्यवस्था चांगली आहे, हे ठरवितांना कोणच्या त-हेमध्ये सर्वांत अधिक चांगुलपणा व कमी वैगुण्य आहे, याचा विचार करणे अवश्य आहे.ब्रिटिश कौन्स्टिटयूशन किंवा राज्यव्यवस्थेमध्ये या वरील प्रत्येक तव्हेंतील चांगल्या गुणांचा उत्तम प्रकारचा मिलाफ झाल्याचे आपण पाहतो.राज्यांतील तीन्ही 'इस्टेट्स'मुख्य वर्ग-राजा, वरिष्ठ लोक व प्रजा-यांच्या अधिकारांचा समतोलपणा, व 'पार्टी सिस्टिम'-दोन पक्षांच्या द्वारे चाललेली राजकार्याची व्यवस्था या दोहोंमुळे एकंदरीत राज्यकारभाराचें काम समाधानकारक चालले आहे. कोणत्याही उपायांनी या पद्धतींतील दोष नाहीसे करतां आले तर, ही पद्धति सर्वोत्कृष्ट होईल. पण या जगामध्ये सर्वोत्कृष्टपणा केव्हाही दुर्मिळच. आपण आहे त्या स्थितीतच शक्य तेवढे हित साधले पाहिजे. या दृष्टीने पाहतां ब्रिटिश पार्लमेंटरी अमलांत जोपर्यंत खरेपणा, न्याय व सहानुभूति, ही प्रेरक तत्त्वे आहेत,तोपर्यंत तो अंमल राज्यव्यवस्थेसंबंधांत शक्य तितका उत्तम आहे, असेंच दिसते. ____पण हे विचार व कल्पनातरंग बाजूला ठेवून मला 'सेंट स्टीफन्स'ची सफर पुरी केली पाहिजे. यांतील 'लाब्बी' ही १२६