पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पार्लमेंट-सभागृहे. एक बलाढ्य प्रस्थच होय. वादविवादाच्या झगड्यामध्ये पक्षाभिमानाचा अतिरेक झाला असतां तात्कालिक युक्तायुक्ततेच्या स्थंडिलावर सार्वजनिक हिताचा बळी पडण्याची भीति असते. हिंदुस्थानासारख्या देशांतून येणाऱ्या मला, ही गोष्ट विशेष जाणवली. तेथे साया कौन्सिलांतून स्वदेशभक्तीविषयींची कल्पना भारी उदात्त व उच्च स्वरूपाची दृष्टीस पडत असते. दोन्ही प्रमुख पक्षांतील मंडळी वाक्कलह व झगडे करण्याच्या ऐवजी आपल्यामधून सर्व सभेच्या विश्वासास पात्र असे सुमारे सहासहा प्रतिनिधि निवडून त्यांच्या कमेटीकडे ज्याविषयी मतभेद आहे, अशा प्रश्नांच्या निकालाचे काम सोपवितील तर, त्या योगाने शहाणपणाचे कायदेकानू करण्याच्या कामी विशेष फायदा होईल, असा एक विचार माझ्या मनांत आला. या योगाने हल्ली होत असलेला पुष्कळसा वेळेचा अपव्यय टळेल आणि खुद्द पार्लमेंटमध्येच नव्हे तर साऱ्या देशभर माजणारें वैमनस्य बंद पडेल. मी सुचविलेल्या या त-हेला, थोड्याशा लोकांच्या हातींच विशेष सत्ता जाईल, असा एक आक्षेप घेता येईल हे मी जाणतो.पण आमां प्राच्य लोकांना राष्ट्रीय भवितव्यतेच्या नियमनाचे काम मध्यम बुद्धीच्या बहुजनसमाजापेक्षां, थोड्याशाच शहाण्या लोकांच्या नेतृत्वाखाली असणे अधिक श्रेयस्कर मानण्याची संवय पडून गेलेली आहे. कोणच्या त-हेची राज्यव्यवस्था परिणामी फायदेशीर होईल हे ठरविणे सोपें नाही. कारण जागजागी वस्तुस्थिति बदलते.