पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ब्रिटिश पार्लमेंटची पद्धत सर्वथैव उत्तमच आहे, असे काही मला वाटले नाही. हिंदुस्थानात कायदेकौन्सिलामध्ये सभासद भाषणे करितात, तेथे एखाद्या विषयाला पाठबळ देणारें बहुमत मिळविण्यासाठी जज व जूरी यांच्यापुढे स्वपक्षाचे समर्थन करावे लागते, तद्वत् योग्य व शांत बुद्धिवाद योजून प्रयत्न केला जातो. पण ब्रिटिश राजकारणामध्ये हवा तितका शब्दच्छल व खरी खोटी कारणे पुढे करून स्वपक्षाचे समर्थन करण्याचे कामी प्रयत्न करण्यास प्रत्येक पक्षाचे लोक कसर करीत नाहीत असे दिसते. बोलणारा आपल्या भाषणाचा अक्षरशः किंवा अगदी सरळ अर्थ घेतला जावा, असें कदाचित् इच्छीत नसेल. पण त्याला निवडून देणाऱ्या मतदारांचा काही भाग त्यांच्या भाषणाचा अगदी सरळ तोच अर्थ करतात हे खास. परिणामावरून साधनांचे गुणदोष ठरविले पाहिजेत, असा कोटिक्रमही लढविता येईल. पण ही अव्वल प्रतीची मुत्सद्देगिरी नव्हे. मोठमोठे राजकीय पक्ष असणे इष्ट असण्याबद्दल बरेचसें समर्थन करता येण्यासारखे आहे; कारण त्यामुळे अधिकार व हक्क यांचा दुरुपयोग न होण्याबद्दल काही अंशी हमी मिळते. चाललेली भाषणे व वादविवाद ऐकत असतांना मला असें वाटले की, मेंबर लोक निवडणुकीच्या भागांत स्वतःच्या मतांचा जो प्रसार करावयाचा तो पार्लमेंटांतील भाषणांच्याद्वारे करतात; कारण या राष्ट्रांत वर्तमानपत्रे म्हणजे राजकीय बाबतींतील १२४