पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पालमेंट-सभागृहें. ठेवण्याजोगे आहे. त्याच्यावरून, हिंदुस्थानांत बायकांना बंद सज्जांत किंवा पडद्याआड ठेवण्याची चाल आहे तिचे स्मरण होते. ' कॉमन्स ' सभेमध्ये 'स्पीकर ची खुर्ची, ही एक ठळकशी चीज आहे. ती ओक लांकडाची असून तिच्यावर सुरेखसे कोरीव काम केलेले आहे. त्या खुर्चीवर एक मोठी मेघडंबरीही आहे. 'स्पीकर' हौस ऑफ कॉमन्स'मध्ये येतो, तो अगदी साध्या थाटाने. त्याच्यापुढे 'मेस'-भालदार काठी घेऊन सशस्त्र ‘सार्जंट ऑफ आर्स'–पोलीस अंमलदार-चालत असतो. व बरोबर त्याचा सेक्रेटरी, आणि चापलेन'-धर्मगुरु-हे असतात. तेथे पोहोचतांच 'चापलेन' प्रार्थना वाचूं लागतो. ती आटपेपर्यंत प्रेक्षकांना आंत जाण्याची परवानगी नसते. आह्मी हिंदी लोक स्वप्नसृष्टीत चूर असल्याविषयं महशूरआमची बुद्धिविकासाची दिशा केवळ कल्पनातरंगांमध्ये दंग होण्याची. 'हौस आफ् कॉमन्स'मधील चाललेले काम पाहात असतांना या निसर्गसिद्ध स्वभावाला मीही बळी पडलो. 'स्पीकर'विषयी अतिशयच आदरबुद्धि दाखविली जाते. तिचा माझ्या मनावर वस्तुतः चांगलाच ठसा उमटला.पक्षाभिमानापासून उत्पन्न होणारा दुराग्रह व मनाचा कुत्सितपणा यांच्यापासून तो अगदी अलिप्त असून, सभेत चाललेल्या वादविवादाचे सुरेख नियमन करितो. यामुळे त्याला, दरबारी लोक राजाला मान देतात, त्याच भावनेने सर्व लोक मानीत असत. येथील बऱ्याच गोष्टी मला पसंत वाटल्या. तरी वादविवादाच्या तन्हेवरून पाहतां, १२३