पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ग्यालयांमुळे भिंती रुक्षशा वाटत नाहीत. मेंबर लोकांचे, इतर सभासदांना उद्देशून चाललेले भाषण सर्वत्र चांगले ऐकू जाण्याला, ही बैठकीची व्यवस्था. फार नामी आहे. पण अधिकारारूढ पक्षांतील 'मिनिस्टर्स' ( प्रधान मंडळी ) बहुतेक नेहमींच, विरुद्ध पक्षाकडे तोंड करून भाषण करितात; व खुद्द त्यांच्या पक्षाचे लोक त्यांच्या मागे बसलेले असतात. ही व्यवस्था मला थोडी अप्रयोजक वाटली. 'फ्रेंच चेंबर ऑफ डेप्युटीज्' मधील ह्या बाबतीची व्यवस्था यापेक्षां बरी वाटते. त्या चेंबरची जागा अर्धवर्तुलाकार केलेली असून, तेथे प्रेसिडेंटाच्या खुर्चीच्या खालच्या बाजूस एक चबुत्र्यासारखी जागा आहे. तेथूनच सर्वजण भाषण करतात. भाषण करण्याला आपली जागा सोडून तेथवर जावे लागते. यामुळे या व्यवस्थेतही थोडी गैरसोय आहेच. पाया 'हौस' दिवाणखान्यामधील तावदानाच्या खिडक्यांतून निरनिराळ्या 'पार्लमेंट'च्या ( बरोज )-विभागां-ची 'आरमोरियल बेअरिगंस्'–विशिष्ट लष्करी चिन्हें-काढलेली आहेत. तसेच त्याच्यांत भक्कम 'ओक' लांकडाचे सुंदर 'पानेलिंग'-तबकवजा काम केलेले आहे. त्या योगानें शोभा, शाश्वती व उपयुक्तता, हे सर्व साधलेले आहे. सन्मान्य परकीयांची व 'पीयर्स'-'लॉर्ड्स' लोकांची, या दोन्ही ग्यालयांमधून खालचा देखावा साफ दिसतो. पण सभ्य स्त्रियांच्या ‘ग्यालरी'च्या आड,पितळी जाळी लावलेली आहे हे लक्षात १२२