पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पार्लमेंट-सभागृहें. बसलेला पुतळा आहे. त्याच्या एका हातांत अधिकाराची निशाणी-राजदंड,-व दुसऱ्यांत विजय आणि कार्यसिद्धि यांचे द्योतक अशी 'लॉरेल' ची माला आहे. उजवीकडे दिसण्यांत कडक व कठोर, अशी न्यायदेवता उभी आहे. तिच्या हाती, प्रत्येक कृत्य तोलण्यासाठी न्यायाचा कांटा आहे. डावीकडे दयेची कृपामय मूर्ति आहे. तिची चर्या सौम्य व कळवळीची अशी दाखविलेली आहे. ती क्षमा व समेट यांचे निदर्शक अशी ऑलिव्हची डहाळी अर्पण करण्यासाठी पुढे झुकलेली आहे. 'हौस आफ कॉमन्स'च्या 'ग्यालरी' मध्ये मी अगदी नवखा किंवा अपरिचित होतो, असें नाही. मजजवळ तेथील रंगीत तसबिरी आहेत. त्यांच्यावरून मला तेथील अंतर्भागाची चांगली माहिती झालेली होती. काही चेहरेही सहज ओळखतां येत होते. ही 'चेंबर' मोठीशी वाखाणण्यासारखी सुंदर किंवा भव्य आहे, असें नाही. प्रथमच पाहणाऱ्याचा ती पाहून बराच हिरमोड होतो, असे मला सांगण्यांत आले. मला तर ती एक कामकाजायोग्य स्थळ आहे, असे वाटले. तेथे बसण्याची सोय नियमितच आहे. तरी तेथें व्हावयाच्या कामाच्या मानाने ही जागा ठीक व योग्य अशीच आहे. तेथे गहिऱ्या हिरव्या रंगाच्या बैठकीच्या रांगा असून त्यांच्या मध्यभागी रुंद व प्रशस्त रस्ता सोडलेला आहे. या बैठकीच्या रांगांना बेताचा चढाव दिलेला असून बाजूच्या १२१