पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पहिले वाचन करण्याचा आपला हक्क बजावतात. पुढे तें भाषण दोन्ही ' हौसेस्' मध्ये अनुक्रमें 'लॉर्ड चान्सेलर' व 'स्पीकर ' पुनः वाचतात. त्यास उत्तरादाखल मानपत्र देण्याची सूचना एक सभासद पुढे आणतो व त्यास दुसरा अनुमोदन देतो. ते दोघेही अधिकारारूढ पक्षांतले व या प्रसंगी दरबारी पोषाख केलेले असावे लागतात. या मानपत्रांत बहुतेक मूळ भाषणाचाच अनुवाद असतो. विरुद्ध पक्ष बहुधा या मानपत्रांत काही दुरुस्त्या करण्याची सूचना पुढे आणतो. आणि अशा रीतीने अधिकारारूढ पक्षाच्या राज्यकारभाराच्या धोरणावर टीका व हल्ला करण्याची संधि विरुद्ध पक्षाला पार्लमेंट सुरू होतांच मिळते. मानपत्राबद्दल एकवाक्यता झाली ह्मणजे, तें रीतीप्रमाणे राजेसाहेबांना अर्पण केले जाते. सरकारी दरबारी समारंभाच्या प्रसंगी उपयोग करण्याची राजेसाहेबांचा पोषाख करण्याची खोली पृथक् आहे. 'किंग आर्थर अँड हिज् नाइट्स् ऑफ धि राउंड टेबल' यांच्या संबंधाची दंतकथा दर्शविणाऱ्या उठावदार व उत्तमोत्तम चित्रांच्या योगाने तेथें भारी शोभा आलेली आहे. त्याच्या छतावर फारच सुरेख प्यानेलचे ( तबकवजा) काम केलेले आहे. त्याला लागूनच राजकीय ' ग्यालरी' आहे. तिच्यांत 'वॉटळूच्या लढाईनंतर वेलिंगटन व ब्लूशर यांची भेट' व 'नेल्सनचा मृत्यु' ही अत्युत्तम चित्रे आहेत. जवळच 'प्रिन्सेस ग्यालरी' आहे. तेथे उंच सिंहासनावर महाराणी व्हिक्टोरिया यांचा १२०