पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पार्लमेंट-सभागृहे. राण्या, यांची रांगत कांचांच्या तुकड्यांनी बनविलेली चित्रे असलेल्या मोठमोठ्या व प्रेक्षणीय खिडक्या, इत्यादिकांनी या भव्य दिवाणखान्याला शोभा आणण्याच्या कामाची पूर्तता झाली आहे. राजेसाहेबांची स्वारी 'पार्लमेंट' सुरू करिते तेव्हांचा समारंभ फारच प्रेक्षणीय होतो. त्या प्रसंगी 'पीयर्स' 'लॉर्डस्' लोक, ठरीव दरबारी पोषाख घालून, शहानशहाच्या स्वागतासाठी उभे असतात. 'ब्लक रोड' ( काळ्या रंगाचा व सोन्याचा सिंह मुठीवर बसविलेला राजदंड, अधिकाराचे चिन्ह म्हणून हातीं धारण करणारा अंमलदार ) 'कॉमन्स' व त्यांचा 'स्पीकर' यांना 'होस ऑफ लॉर्ड्स' च्या 'बार' - दिवाणखान्यांतील विवक्षित हद्दी-पर्यंत बोलावून आणण्यासाठी पाठविण्यात येतो. ते आल्यावर, बादशहा सिंहासनावरून आपले भाषण वाचून दाखवितात. ते 'क्याबिनेट'( प्रधान मंडळा )नेच तयार केलेले असते. त्यांत ब्रिटिश राज्याचे परराष्ट्रांशी वसत असलेल्या राजकीय संबंधाचे सिंहावलोकन व सुरू होणाऱ्या पार्लमेंटपुढे प्रधानमंडळाकडून जी कायद्याची बिलें यावयाची असतात, त्यांचा सारांश दिलेला असतो. 'कॉमन्स' लोक तेथून आपल्या जागी परत जाताच, आपण सिंहासनावरून झालेल्या भाषणांत नमूद असलेल्या विषयांचाच विचार करण्याला बांधले गेलो नाही, असे सिद्ध करण्यासाठीच जणों, बहुतकरून कोणच्या तरी एका बिलाचें