पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ठेवलेले असून, त्याच्यावर असलेल्या अनमोल मेघडंबरीमुळे ते फारच खुलून दिसते. त्याच्या डाव्या बाजूला क्वीन एम्प्रेस् मेरी यांचे सिंहासन व उजव्या बाजूला हिज रॉयल हायनेस प्रिन्स ऑफ वेल्स यांची दरबारी बैठक आहे. त्याच्या दोन्ही बाजूला दोन, सोन्याचा मुलामा केलेली सुरूच्या झाडाच्या आकाराची उंच शामदाने आहेत. सिंहासनाच्या पुढेच लॉर्ड चान्सेलरची वूलसक-गादीदार काचे आहे. पूर्वी लोंकर पैदा करून ती परदेशी पाठविणे, हाच इंग्लंडचा मुख्य धंदा व व्यापार होता. त्यावेळी नक्षीदार व सुरेख काम केलेले लोकरीचे मऊ गादीवजा थैले. लंडन येथील व्यापारी, या हौसला ( सभेला ) शिष्टाचार, व आपल्या धंद्याच्या महत्त्वाचे निदर्शक ह्मणून नजर करीत असत. त्यावरून या कोचाला वूलसक हे नांव पडले आहे. तळमजल्यावरील बाकीच्या भागांत आडवीं बांके मांडलेली आहेत. त्यांच्या प्रत्येक बाजूला भिंतीपर्यंत लाल रंगाच्या. बैठकींच्या रांगा एकीवर एक लागलेल्या आहेत. अधिकृत पक्षापैकी सन्मान्य · लॉर्डस् ' व त्यांच्या तर्फेचे इतर लॉर्ड्स सिंहासनाच्या उजव्या बाजूला आणि 'आपोझिशन्'–विरुद्ध पक्षाचे-लॉर्ड डाव्या बाजूला असतात. मधील आडव्या बैठकी,, दोन्ही पक्षांचे नव्हेत अशा मंडळींसाठी राखलेल्या असतात. ओक लांकडावरचे फारच सुरेख कोरीव काम, सुंदर पितळेचे काम, नॉर्मन कांकेस्टपासून निरनिराळ्या राजघराण्यांतील राजे व