पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पार्लमेंट-सभागृहे. शोभा आलेली आहे. ग्लाडस्टनच्या पुतळ्याला अपूरा पुतळा ह्मणतात. कारण त्याच्या डाव्या पायाच्या विजारीच्या भागाला, उजव्या पायाप्रमाणे पट्टीची शिवण दाखविलेली नाही. हे वाचून चिकित्सेखोर मंडळीला चमत्कार वाटेल. पुतळा घडणाऱ्या शिल्पकाराचे यांत दुर्लक्ष झाले आहे. पण त्याने, या गुण-संपन्न मुत्सद्दयाची जी चेहऱ्याची चर्या व ढब दाखविली आहे, ती फारच भारदस्त व सजीवशी आहे. यामुळे त्या चुकीची भरपाई झाली आहे. या अलौकिक पुरुषाच्या अंगी सर्वच -राष्ट्रांतील लोकांविषयीं वसत असलेल्या सहानुभूतीमुळे त्याची जगांतील श्रेष्ठ व महात्मे लोकांमध्ये गणना होत असे. मी 'हौस ऑफ लॉर्ड्स'मध्ये पोहोंचलों तेव्हां, तेथील काम जोरांत चालले होते. लॉर्ड लॅमिंगट्न हे 'बाल्कन्स' मधील मुसलमानांच्या संरक्षणासंबंधी प्रश्न विचारीत होते. पुढे ते मोठ्या मेहरबानगीने आमच्याबरोबर दाखवीत फिरले. 'लॉर्डस' मंडळी फारशी हजर नव्हती. तेथील सभासद लोकांमध्ये शांतता व आराम यांचा प्रभाव दृष्टीस पडत असून, तो त्या दिवाणखान्याचे ऐश्वर्य व सौंदर्य यांस अनुरूप असाच होता. येथे फारच भव्य व शानदार बादशाही सिंहासन ठेवलेलें असून, ते सुवर्ण व गर्दलाल रंग यांचा दैदीप्यमान पुंजच आहे असा भास होतो. या सिंहासनावरून शहानशहा पार्लमेंटची बैठक सुरू करितात. त्या समारंभाचा देखावा मध्ययुगांतील थाटमाटासारखा असतो. हे सिंहासन दिवाणखान्याच्या वरील टोकाला