पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ल्या नामांकित हिंदी गृहस्थांपैकी बहुतेकांचा झालेला आहे.युरोपामध्ये येथून तेथून धर्म, वेश, पेहराव, चाली, शेती, वगैरे बाबतींत बरेचसें साम्य आहे. या संबंधांत साऱ्या युरोपांत मिळून जितके भिन्न प्रकार आढळतील त्यांहून अधिक भिन्नता हिंदुस्थानांतील मोठ्याशा कोण. त्याही शहरामध्ये नजरेस येईल असे त्यांचे ह्मणणे पडते. मला वाटतें हैं ह्मणणे अगदी खरे आहे. धर्म, जाती, राष्ट्रीयपणा, चालीरीती, व परंपरा,इत्यादिकांमधील ही विलक्षण भिन्नता हेच त्या देशांत वास करणा-या ग्रेट ब्रिटनच्या साम्राज्यसत्तेचं अवश्य कारण व तिच्या सामर्थ्याचे मूळ होय. - बाबासाहेबांच्या मतांसंबंधाने विचार करतां, इंग्रज सरकाराला मान्य असलेली धर्मपद्धति आणि प्रेस्बिटेरियन् व वेस्लियन् पंथ यांच्यामधील धर्मविषयक निरनिराळ्या पंथांचे बाबासाहेबांनी जें वर्णन केले आहे, त्याच्याहून थोडक्यांत पण पुर्ते विशद असें वर्णन क्वचितच करता येईल. लंडन शहरांतील पोलिसाविषयी त्यांना फार कौतुक व आदर वाटतो. हौस आफ् कॉमन्स सभेचे वर्णन करितांना त्यांनी तेथील वादविवाद ऐकून, लोकमतप्रवर्तनाचे काम जणों पार्लमेंट सभेतील भाषणांच्या द्वारेंच केले जाते, अशी माझी समजूत झाली,' असे लिहिले आहे, ते किती तरी समर्पक आहे ! इकडील चालीरीती, व पेहरावाच्या त-हा, यांविषयी त्यांनी निःपक्षपाती वृत्ति धरिली आहे. इकडील तरुण बांड मंडळीने असले ताठ, उंच, सफेत 'कॉलर'-गळबंद-आणि आंवळ व चिंचोळे बूट वापरीत-व त्यांच्यापासून होणारा त्रास सोशीत-राहावें, याविषयी त्यांनी आश्चर्य प्रगट केले आहे. एतद्विषयक अशीच टीका इतर पुष्कळ ठिकाणांहन-त्यांतही विशेषतः, हा त्रास सोसावा लागणाऱ्या मंडळीच्या तोंडून सुद्धां-ऐकू येत नाही, असे नाही. तसेच अलीकडील स्त्रियांच्या पेहरावाच्या नाना तन्हांविषयीही त्यांचे मत