पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. व तिने तेथील अंमलदार लोकांना अवचित गांठलं. त्यांच्यांतील एका स्त्रीने बरोबर नेलेल्या सांखळीने, स्वतःला लॉर्ड फॉकलंडच्या पुतळ्याच्या एका पायाला जखडून घेतले; आणि 'स्त्रियांचे हक्क' यावर मोठमोठ्याने बडबड चालविली. पोलीस लोक धावून आले व त्यांनी त्या कजागिणीला जबरदस्तीने तेथून ओढून नेले. त्या दांडगाईमध्ये लार्ड फॉकलंडच्या पुतळ्याच्या पायाचा एक भाग तुटून गेला.. 'सेंट स्टीफन्स हॉल' मधून मोठ्या दिवाणखान्यांत गेल्यावर, तेथील सजावट व रोषनाई पाहून, भारी अचंबा वाटतो. हा दिवाणखाना 'हौस ऑफ लॉर्ड्स' व 'हौस आफ कामन्स्' यांच्या दरम्यान आहे. त्याच्यावर शानदार घुमट असून त्याच्या खाली, फारच मोठ्या, रांगत कांचेचे काम केलेल्या, खिडक्या आहेत. त्यांतून रंगीबेरंगी प्रकाश पडतो. त्याचा झालेला मिलाफ फारच मनोरम वाटतोः उत्तर व दक्षिण या दोन्ही बाजूच्या ढेलजेच्या वरच्या भागांत ' सेंट जॉर्ज अँड दि ड्रेगन' व वेल्सचा पुरस्कर्ता महात्मा ' सेंट डेव्हिड,' यांची अनेक रंगांच्या काचांच्या तुकड्यांनी बनविलेली सुंदर चित्रे आहेत. भिंतींमध्ये कोनाडे असून त्यांत ब्रिटिश राजे व राण्या यांचे पुतळे आहेत. जमिनीवर लॉर्ड जॉन रसेल, धि अर्ल ऑफ इड्डस्ले ( सर स्टाफर्ड नार्थकोट), जान ब्राइट, लॉर्ड ग्रानव्हिल, व ग्लाड्टन अशा विख्यात मुत्सद्दयांचे भव्य पुतळे आहेत. या योगाने त्या स्थळाला भारी