पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पार्लमेंट-सभागृहे. (सभ्य स्त्रियांच्या ग्यालरी) मध्ये कृपा करून जागेची सोय करविली होती. तेथे जावयाच्या पूर्वी ही ऐतिहासिक इमारत आह्मी फिरून पाहून आलो होतो. हे पाहात फिरणेही अत्यंत मजेदार व आनंददायक झाले होते. ___सेंट स्टीफन्स हॉल'च्या भव्य इमारतीमध्ये, आम्ही एका साध्याशाच 'पोर्च' ( ढेलज ) मधून गेलो. आंत शिरतांच तेथें, पूर्वकालीन प्रसिद्ध मुत्सद्दयांचे संगमरवरी पुतळे दृष्टीस पडतात. बर्क व ग्राट्टन, पिट्ट व फॉक्स, मान्सफील्ड, सामर्स, चाथाम, वालपोल, सेल्डेन, हापडेन, क्लारेन्डन, आणि फोक्लंड, अशा विख्यात व थोर पुरुषांचे स्मारक, असे हे पुतळे, ज्यांच्या त्यांच्या नेहमींच्या ढबीमध्ये उभे केलेले आहेत. पिट्ट आणि फॉक्स यांच्यासारख्या कट्ट्या प्रतिस्पर्ध्याच पुतळे, एकमेकासमोर-जणों पूर्ववत् वाग्युद्धाला तयार-उभे पाहून माझ्यांतील विनोदी भावनांना भरते आले व या दोन्ही पुतळ्यांची अस्वाभाविक स्थापना सहजगत्या झाली अगर ती बुद्धिपूर्वक करण्यांत आली, याविषयीही माझ्या मनांत कल्पना आली. लॉर्ड फॉकलंडच्या पुतळ्याला अलीकडे थोडेसें नुकसान पोहोंचलेले आहे.त्याची निशाणी कायम आहे.याविषयींची आख्यायिका अशी आहे की, तीन चार वर्षांपूर्वी स्त्रियांना मताधिकार देण्याच्या चळवळीसंबंधानें दंगेधोपे चालू असतांना या प्रश्नाच्या तर्फेच्या काही आडदांड स्त्रियांची एक टोळी 'सेंट स्टीफन्स हॉल'च्या मार्गाने गुपचिप 'हाउस आफ कामन्स' मधील 'लाब्बी' कडे गेली.