पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. ला ' किंवा 'अप्पर चेंबर' ह्मणतात. आजकाल सर्क राजकीय सत्ता मुख्यत्वे लोकनियुक्त 'चेंबर '_' हौस ऑफ कॉमन्स' (प्रजेच्या प्रतिनिधींची सभा ) इच्यामध्येच केंद्रीभूतशी झालेली आहे. निरनिराळे : रिफार्म आक्ट्स' किंवा सुधारणुकीचे कायदे पसार होऊन, निवडणुकीच्या हक्काची ( मते देण्याची ) सत्ता प्रथम थोर जमीनदारांच्या हातून निघून, मध्यभ स्थितीच्या लोकांच्या हाती व नंतर साधारण लोकसमाजाच्या हाती गेली आणि अखेर आतां हळूहळू जी लोकप्रिय प्रजासत्तात्मक राज्यव्यवस्था अस्तित्वात आली आहे, तिच्यांत ब्रिटिश राजसत्तेतील खरे स्वातंत्र्य व्यक्त होत आहे व ती इतर राष्ट्रांना नमून्यादाखल झालेली आहे. ब्रिटिश राष्ट्राचा उदय व प्रगति, व ज्याच्यावर सूर्य नेहमी उदित राहतो, असें महान् साम्राज्य,, यांची घटना इत्यादिकांचा इतिहास, पार्लमेंट सभागृहे पहात. असतांना चित्तचक्षुपुढे एखाद्या विस्तृत व विचित्र देखाव्याप्रमाणे तरंगतसा राहतो. 'इंडिया ऑफिसाने कृपा करून आमची तेथे जाण्यासंबंधी व्यवस्था केली होती. आमच्याकरितां 'होस ऑफ कॉमन्स'मध्ये डिस्टिग्विष्ड स्टेंजर्स ग्यालरीत (प्रसिद्ध परकीय लोकांसाठी राखून ठेवलेल्या ग्यालरीत ) जागा केली होती. तेथून खाली जमलेल्या मंडळींचा देखावा नीट व स्पष्ट दिसत होता. मिस्टर जोसेफ किंग एम्. पी., यांनीही तशीच राणीसाहेबांसाठी लेडीज् ग्यालरी