पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पार्लमेंट-सभागृहें. चालू झाला, इतकेच नव्हे, तर त्याबरोबरच पार्लमेंट व जमीनदार मंडळी यांचेही श्रेष्ठत्व कायम झाले, आणि राष्ट्रीय कारभारामध्ये त्यांचाच शब्द पुष्कळ काळपर्यंत विशेष प्रबळ अधिकाराचा राहिला. राजा व प्रजा यांच्यामध्ये मधून मधून झगडे होत राहिले, पण त्यांच्यापासून हळू हळू राजकीय पक्ष व प्रधान मंडळ अशा दोन 'पार्टीज्'–पक्ष–व 'क्याबिनेट' यांनी वटित राज्यव्यवस्था वृद्धिंगत झाली. ब्रिटिश राज्यव्यवस्थेमध्ये राजाच्या ऐवजी अधिकारारूढ पक्षच निर्णायक अधिकारी बनला व 'क्याबिनेट' अधिकारारूढ पक्षाची कार्यकर्ती 'कमेटी' झाली. 'हौस ऑफ कामन्स'-सामान्य लोकांच्या प्रतिनिधींची सभा-इच्यामध्ये 'क्याबिनेट' नें बहुमत अनुकूळ करून घेतले असल्यामुळे, ती राजाला सर्व प्रजेच्या तर्फे -म्हणून सल्ला देऊ लागली. ती राजाने मान्य न करणे म्हणजे, 'क्याबिनेट'ला राजीनामा देण्याला सांगण्यासारखेच होते.त्यानंतर पार्लमेंट 'क्याबिनेट' च्याच पक्षाला कायम राहिली तर, त्या 'पार्लमेंट'ची बरखास्ती किंवा राजाने माघार खाऊन त्या पार्टीचे म्हणणे मान्य करणे, हे ठरलेले. राज्यांतील तीन ' इस्टेट्स् ' ह्मणजे राजा, लॉर्डस् स्पिरीचुअल व टेंपोरल (धर्मसंबंधी व राज्यसंबंधी सरदार ) आणि कामन्स' (प्रजेचे प्रतिनिधी) हे सर्व मिळून 'ब्रिटिश पार्लमेंट ' होते, हे सर्वांना माहीतच आहे. ला स्पिरीचुअल व टेंपोरल एकत्रच बसतात. त्यांना 'हौस ऑफ