पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. धिकाराचा पुष्कळसा अंश जबरदस्तीने राजाकडून काढून घेतला. पुढे ही सरदार मंडळी आपसांत भांडूं लागलेली आढळते. त्याचा परिणाम असा झाला की, राजाला आपली पूर्वीची पूर्ण सत्ता प्रस्थापित करतां येऊन तो पुन्हां वस्तुतः निरंकुश सत्ताधारी बनला. याच्याही पश्चात् सरदार व मध्यम स्थितीतले लोक यांच्या साहाय्याने व संमतीने राजा अधिकार चालवीत असलेला दिसून येतो. पुनः पुढे याच लोकांच्या हाती अधिकाधिक राजसत्ता जाते. ' पार्लमेंट' शब्दाचा जो लौकिक अर्थ समजला जातो, त्या अर्थाची पालमेंट सभा ब्रिटिश जनतेच्या हक्काच्या सुप्रसिद्ध सनदे ( ग्रेट चार्टर ) वर जान राजाला सही करणे भाग पाडले जाई तों, अस्तित्वात आली नव्हती. ही प्रसिद्ध सनद ब्रिटिश स्वातंत्र्याचा मूळ पाया असें नेहमीं मानतात. पुढे ती अनेक वेळां पुनःपुनः कायम केली गेली आहे. पार्लमेंट हौसेस–सभागृहा-समोर क्रॉमवेल्चा घोड्यावर बसलेला सुरेख पुतळा उभा केलेला आहे. इंग्लंडच्या इतिहासांतील आणखी एका ठळक स्थित्यंतराच्या क्षेत्रमर्यादाचिन्हाचा व काळाच्या विलक्षण घडामोडीचा तो पुतळा स्मारक आहे. सामाजिक स्वराज्य–'कामन वेल्थ'-च्या नंतर राजकीय पेंडयुलम्ओळंब्या-ला 'रिस्टोरेशन' चा हक्कदार राजाला पुनः बोलावून आणण्याचा-एक हेलकावा पुनः सुदैवाने मिळाला. त्यामुळे डोईजड लष्करी जुलुमाऐवजी, पुनः राजकीय अंमल