पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पार्लमेंट-सभागृहे. वसतिस्थानाचे आपल्या नेत्रांना प्रत्यक्ष दर्शन घडावे, अशी मला साहजिक व उत्कट लालसा होती. ब्रिटिश अंमल व -राज्यव्यवस्था म्हणजे, मूर्तिमान् स्वातंत्र्य व प्रगति, अशी माझी अगदी अव्वलपासून दृढ कल्पना झालेली होती. दीर्घकाल मनांत -मुरून राहिलेली ही माझी इच्छा या विलायतच्या सफरीने मला पूर्ण करतां आली. साऱ्या मोठ्या वस्तूंचा मूळारंभ अणुमात्रच असतो. हिंदुस्थानांत वनप्रदेशांतील वृक्षराज असा राक्षसी वटवृक्ष एका राई एवढ्या बीजापासून पैदा होतो. अफाट महासागराकडे धांव घेणाऱ्या महानदीचा उगम पर्वताच्या कड्यावरून थेंबथेंब टपकणाऱ्या लहानशा ओहोळापासून असतो. ही नैसर्गिक सृष्टीमध्ये दिसून येणारी गोष्ट समाजामध्येही तत्त्वतः दिसून येते. ब्रिटिश कायदे करणाऱ्या मंडळीचे बीज शोधूं गेले तर तें साक्सन् काळांतील शहाण्या लोकांच्या 'विटॅन् एगेमाट' मध्ये सांपडते.हिंदुस्थानांतील ग्राम-पंचांशी त्याची काहींशी तुलना होऊ शकते. 'नार्मन कांक्वेस्ट 'च्या-नार्मन लोकांनी इंग्लंड जिंकून घेतले त्या वेळी राज्यकारभार राष्ट्रीय 'कौन्सिल' किंवा सरदार मंडळी यांच्या मार्फत होत होता. राजाच त्या मंडळाचा अध्यक्ष असे. पण त्यानेच सर्व सत्ता बळकावल्यामुळे, या मंडळाची कार्यमर्यादा संपुष्टांत आलेली होती, असे दिसते. पुढे काही काळानंतर सरदार लोकांनी एकदिल होऊन राज्या