पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पण याखेरीज त्यांच्या भोंवतीं या थोर ब्रिटिश राष्ट्राचे जीवन व उमेदी यांच्याशी सर्वथैव संलग्न अशी किती तरी स्मारके जमून वृद्धि पावत आलेली आहेत की, त्यांमुळेही पाहणाराचें मन आकर्षित झाल्याशिवाय राहात नाही. अशा या इमारती अर्थातच दोन्ही पार्लमेंट गृहे व वेस्टमिन्स्टर ऑबे, या होत. या दोन्ही बादशाही व भव्य इमारतीज्यांच्या वैभवापुढे मोगल लोकांच्या प्राचीन संगमरवरी प्रासादांचे तेज फिके पडतें–मधील परस्पर संबंध पुष्कळांना कदाचित् माहित असेल त्याहून किती तरी निकट व खरा आहे. कारण, प्राचीन काळी पार्लमेंटाला काही काळ वेस्टमिन्स्टर ऑबेमध्ये तात्पुत स्थळ मिळालेले होते. या ऑबेमधील पूर्वीची कायदे करण्याची ' चेंबर' अद्यापि पाहण्यास जाणाऱ्यांना एक कौतुक वाटण्याजोगें स्थल आहे. माझ्या लहानपणापासून या महान् ब्रिटिश पार्लमेंटच्या संबंधाने मी किती तरी ऐकलें व वाचलें होतें. तत्संबंधी चित्रांमुळे माझ्या मनांत पूर्वीपासूनच त्यांच्याविषयी दृढ परिचय उत्पन्न झालेला होता. मी इंग्रजी इतिहास शिकू लागलों तेव्हांपासून, 'सेंट स्टीफन्'चा राजवाडा-जेथून मोठमोठ्या हालचालींना प्रारंभ झालेला, व सामाजिक प्रगतीसंबंधी कायदेकानू पसार झालेले होते त्याने माझ्या कल्पनापटावर फार विस्तृत जागा व्यापलेली होती. ब्रिटिश सत्ता व सरकार, यांच्या या मूळ ११०