पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग दहावा. पार्लमेंट-सभागृहे. "तूं ज्या काही योजना मनांत आणशील, त्या तुझ्या देशाविषयींच असूं देत.” शेक्स्पियर. लंडन हे ब्रिटिश राजसत्तेचे मुख्य स्थान. अनंत, मनोहारी व वैचित्र्यविशिष्ट साधनांच्या दृष्टीने साऱ्या भूमंडळांत दुसऱ्या कोणत्याही शहरास लंडनइतका अभिमान बाळगता येणार नाही; किंवा ऐतिहासिक संबंधाच्या समृद्धीविषयी लंडनची बरोबरी करतां येणार नाही. हे प्रचंड व प्रभावशाली शहर, त्यांतील सुंदर इमारती व चित्रपटासारखे रस्ते, यांची खरी कल्पना नुसत्या शाब्दिक वर्णनाने होणे शक्यच नाही. येथील चित्तवेधक,स्फूर्तिदायक ब विस्तीर्ण देखाव्याचा चित्रपट बनण्याला साधन होणाऱ्या वस्तूंपैकी दोन वस्तू अशा आहेत की, त्यांच्यासंबंधाने तेथे जाणारे लोक आश्चर्यचकित झाल्यावांचून राहात नाहीत. त्यांचे सौंदर्य क त्यांची अप्रतिम ढब यांमुळे त्यांच्याकडे अवश्यमेवं मन वेधतेच. १०९