पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. आम्ही इंग्लंडांत असतांना 'दि ग्रेट पर्ल मिस्टरी'-मोत्यांची विलक्षण भानगड-या नांवाने वाखाणलेल्या चोरीच्या कामांत ब्रिटिश पोलीस व्यवस्थेची शिताफी व चातुर्य यांचे एक उत्कृष्ट उदाहरण घडून आले. त्या कामी एका हिंदी गृहस्थाला बराच महत्त्वाचा भाग घ्यावा लागला होता. सुमारे १३५००० पौंड (२०२५००० रुपये) किमतींचा एक मोत्यांचा कंठा पारीस व लंडन यांच्या दरम्यान टपालांतून गहाळ झाला. ज्याच्या नांवानें तो रवाना झाला होता, त्याला रत्नांच्या ऐवजी खडीसाखरेच्या खड्यांचे पार्सल मिळाले. 'पारिस' येथे हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या एका हिंदी जवाहिऱ्याकडे त्या कंठ्यांतले मोती विक्रीसाठी आले होते. त्यामुळे अधिकारी लोकांना ही चोरी. करणाऱ्या मंडळीच्या मागावर जाता येण्याचे साधन मिळवून देण्याची त्याला संधि सांपडली. ते चोर पुढे लंडनमध्ये धरले गेले व त्यांची चौकशी झाली. तोवर त्या चोरीचा पत्ता लावून मोती परत मिळवून देण्यासाठी १०००० पौंडां-(१५०००० रुपयां )चे बक्षिस लावले गेले होते व तें मोती कोठे आणि कसे गडप झाले, याविषयी साऱ्या युरोपभर चर्चा चालू झाली होती. लंडनच्या एका रस्त्यावर या मोत्यांचे पुडकें सहज एका मजुराला सांपडले. तें पुडकें त्या मजुराने प्रथमतः एका बाजूला लाथाडलें होतें. - त्याच्यांतील निधीविषयी त्यावेळी त्याच्या स्वप्नांत सुद्धां कल्पना नव्हती! १०८