पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचे पोलिस. लक्षात ठेवणे जास्त जरूर आहे. राज्यकारभारावर खऱ्या ब्रिटिश चारित्र्याचा छाप पुर्ता उमटण्याला, जिम्मेदारीच्या व भरंवशाच्या जागेसाठी निवडावयाचे लोक वरिष्ठ प्रतीचे व चांगले-इंग्लंडांत ते ज्या अर्थी समजले जाते तसें-शिक्षण मिळालेले असे निवडले गेले पाहिजेत. या शिक्षणामध्ये प्रामाणिकपणा, चोखपणा, कळकळ व कर्तव्यदक्षता, इतक्यांचा समावेश होतो. शिक्षणाशिवाय एकाहून दुसऱ्या हिंदी माणसामध्ये विशेषसा फरक आढळणार नाही. काही लोक असे समजतात की, सुशिक्षित लोक पोलिसांना प्रसंगविशेषीं करावी लागणारी कामे करण्याला योग्य नसतात व ते वरिष्ठांना हरत-हेनें खुष ठेवण्याला झटत नाहीत. हे मत पुष्कळशा लोकांत प्रचलित आहे किंवा कसे, किंवा ते कितपत खरे आहे, हे मला खात्रीपूर्वक सांगता येत नाही. असें असेल व याचा अर्थ इंग्रजी शिक्षण मिळालेले लोक किरकोळ कुरापती व किटाळे उपस्थित करणे, किंवा जुलुम करणे, याला तयार नसतात, असाच असेल तर, हेच त्यांची खरी किंमत वाढविण्याला मुख्य कारण होय. त्यांना नापसंत करण्याला नव्हे. असे खरे व सत्यप्रिय लोक नेमल्याने सरकार व सरकारी अंमलदार यांचा लौकिक कमी न होतां उलट तो वाढेल व अशा रीतीने सुधारणा झालेल्या पोलीस व्यवस्थेमुळे सामाजिक उन्नति व प्रगति, यांना उत्तेजन मिळेल.