पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाराजी आहे, हे खरे; तरी पण ती सत्ता बलवत्तर व कायम राहाण्यावरच हिंदुस्थानाचे भावी स्वास्थ्य आणि कल्याण निःसंशय व पूर्णपणे अवलंबून आहे, असेंच त्यांचे मत आहे. डील क्यासल येथे रहात असतांना त्यांचा मला प्रत्यक्ष सहवास घडला. त्यांनी जवळच एक घर भाड्याने घेतले होते. आंग्लोइंडियन मंडळीचे लक्ष यावेळी पूर्णपणे वेधून टाकणाऱ्या अनेक विषयांवर त्यांची 'माझी पुष्कळ वेळ मनोहर संभाषणे झाली. त्यांत त्यांचा बहुश्रुतपणा, त्यांचा निःपक्षपात, व हिंदुस्थानाला इंग्रजी अमलापासून प्राप्त होणाऱ्या फायद्याचे पुरे महत्त्व ओळखून ते व्यक्त करून दाखविण्याची उघड इच्छा, इत्यादिकांचा मजवर पुष्कळच परिणाम घडला. तसेंच हिंदुस्थानाचा राज्यकारभार हल्लींपेक्षा अधिक प्रमाणाने हिंदी लोकांच्या हाती असणे इष्ट आहे, व त्यांच्यावरील देखरेख व त्यांना योग्य सल्ला देण्याचे काम अल्पसंख्याक युरोपियन लोकांकडून व्हावे, असे आपले मतही त्यांनी मोकळेपणी सांगितले. 'ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य ' या पुस्तकाच्या पर्यालोचनाने एक तर त्यांची अत्युत्तम व अर्थपूर्ण इंग्लिश भाषासरणी, व दुसरें, त्यांतील वर्णनामध्ये व्यक्त होणारा विलक्षण चाणाक्षपणा व ग्राहकता, यांचा वाचकांच्या मनावर चांगला ग्रह झाल्यावांचून राह'णार नाही. या लेखांमध्ये ज्या नानाविध विषयांचा समावेश झाला आहे त्यांचा परस्पर विशेषसा संबंध आहे, असे नाही. तरी युरोपाशी किंवा तेथील सुधारणेशी प्रत्यक्ष पूर्वपरिचय मुळीच नसलेल्या गृहस्थाच्या मनावर झालेल्या परिणामाचे निदर्शन, या नात्याने ते विचा. रणीय व मनोहर आहेत. ज्या दृष्टीने ही नानाविध वर्णने लिहिली आहेत, ती सामान्य युरोपियन लोकांच्या दृष्टीहून भिन्न आहे, तरी त्यांनी काढलेले निष्कर्ष बहुतेक सुशिक्षित युरोपियन लोकांना पूर्वीच पूर्णपणे संमत झालेले असे आहेत. युरोपखंडांतील जीवनक्रम एकाच तहेचा व एकमेकांसारखा आहे असा ग्रह युरोपमध्ये प्रवास केले