पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पूर्वी हुदेदार लोक फारच कमी अक्कलवान् असत. आपणाला मिळालेली हुकुमत ही द्रव्य मिळविण्याचे साधन आहे असे ते समजत व त्याचा उपयोग करून घेण्याची संधि गमावणारा तो एक विक्षिप्त व्यक्ति, असे मानले जावयाचे. अशांतल्या कोणी अशिक्षित हुद्देदारानें वरिष्ठाची मर्जी संपादण्यासाठी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग किंवा त्याच्या बाहेर वर्तन करण्याला कांकू केले नाही तर तो तितक्याच प्रमाणांत लोकांवर जुलूम करण्याला व त्यांच्याकडून गैरकायदा मूठदाबी वसूल करण्यालाही तयार होता. सरकाराने नुकत्याच अमलांत आणलेल्या सुधारणा पुष्कळ फायदेशीर झालेल्या आहेत; तरी जास्त सुधारणेला आणखी पुष्कळ जागा आहे. या सुधारणा यशस्वी होण्यास हुद्देदारीच्या जागेवर हल्लीपेक्षां निराळ्या व उच्च प्रतीचे हिंदुलोक नेमले पाहिजेत. ब्रिटिश सुपरिटेंडेंट व त्यांचे असिस्टंट सामान्यतः उत्तमांतलेच असतात. पण त्यांच्या हातांखालच्या अंमलदारांची निवड करतांना योग्य त-हेची माणसे मिळवितां येणें फार कठिण आहे. हे हुद्देदार अगदी निर्लेप व सच्चे असले पाहिजेत. तसेच समाजामध्ये त्यांचे वजन असणेही अवश्य आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र सांपडणे पुष्कळ प्रसंगी कठिणच असते. हे साध्य होण्याला खरोखर चांगल्या अस्सल घराणदार व वरिष्ठ प्रतीचे इंग्रजी शिक्षण मिळालेल्या माणसांमधूनच निवड झाली पाहिजे. त्यांतही शिक्षणविषयक बाब नेहमी १०६