पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचे पोलिस. जबरदस्ती होईल, अथवा तो पोलिसाच्या मेळांतला असेल, तरच तो सामान्यतः पोलिसाच्या मुकदम्यांत साक्षी देण्याला पुढे येतो. नाही तर खरी हकीकत सांगण्याला पुढे येण्याची पर्वा बहुत करून कोणी करीत नाही. खुद्द सरकार व त्यांनी नेमलेली कित्येक कमिशनें, यांनी या प्रश्नाचा पुष्कळ विचार केलेला आहे. तसेच हिंदुस्थानांतील वर्तमानपत्रांमध्ये, या बाबतींत किती तरी वादविवाद व ऊहापोह झालेला आहे. हल्लीही लांचलुचपतीचा प्रकार जारी आहे. तरी पण गेल्या दहा वर्षांत पुष्कळशा बाबतीत चांगलीच सुधारणा झाली आहे. शिवाय आजकाल हुद्देदार लोक इंग्रजी शिक्षण मिळालेले आणि ब्रिटिश नैतिक कानू व रिवाज यांचा आस्वाद घेतलेले आहेत. ही गोष्ट या पोलीस फोर्सच्या नैतिक स्थितीवर चांगला परिणाम खचित घडवून आणील. साधारणतः पोलिस शिपाई भरती होतात ते खालच्या दर्जाच्या लोकांमधूनच, तेव्हां ते आपल्या सर्वसाधारण समाजापेक्षा चांगले निपजण्याची अपेक्षा करणे शक्य नाही; ही गोष्ट आपण अवश्य लक्षात ठेविली पाहिजे. सर्व समाजाचे मिळून जे काही अवगुण असतील, ते या पोलिस जमातीमध्येही अंशतः प्रतिबिंबित होणारच. शिवाय, त्यांच्या शिक्षणाचाही प्रसार तात्पुरताच व गुन्हे पकडून मुद्देसूद पत्ता लावण्याची अक्कलही बेताचीच असते. १०५