पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. आहे. पण त्यांची कर्तबगारी व उपयुक्तता, यांचा पुष्कळसा भाग सामाजिक सहकारितवर अवलंबून आहे, हे मी वर दाखविलेंच आहे. हिंदुस्थानांत या बाबतींत तफावत आहे, ती मुख्यतः जनतेच्या उपजत स्वभावावर अवलंबून आहे. लडंनचे पोलीस तिकडे नेले त्यांचा स्वभावच तसा अतिमानुष असला व ते कसल्याही मोहजालांत न फसणारे असेच असले तर गोष्ट निराळी--तर त्यांच्या हातून तिकडे तितके चांगले काम उठणे शक्य नाही. कारण तेथील लोक त्यांना इकडच्या सारखें साहाय्य-जें इकडे अगदी साहजिक व अवश्य समजले जाते-देणार नाहीत व त्यांचे हुकूमही तसे सहज मानणार नाहीत. हिंदुस्थानांतील पोलिसांच्या व्यवस्थेमधील अडचणी दूर होण्यासारख्या नसल्याने त्यांना माहिती देण्याला व त्यांच्याशी सहकारित्वानें काम करण्याला लोक नाखुष असतात; आणि समाजाकडून सहकारित्वाची मदत न मिळाल्याकारणाने पोलिसांना आपली कर्तबगारी चांगल्या त-हेने दाखवितां येत नाही. यांत हिंदी पोलिस जवानांनाच केवळ दोष देतां येत नाही. त्यांच्यामध्ये कोणी सच्चा मनुष्य गेला, तर लांचलुचपत व लबाडी त्याच्या पुढे दत्त म्हणून उभ्या. त्या अशा जोरांत असतील तेथें उच्च प्रतीच्या नीतिमत्तेची अपेक्षा करणे . असमंजसपणाचे होय. एखाद्याने स्वच्छ राहण्याचा प्रयत्न केलाच तर त्याचे नुकसान ठेवलेलें. कोणाही मनुष्याचा एखाद्या मुकदम्यांत हितसंबंध असेल, किंवा साक्षी होण्याला त्याच्यावर १०४