पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचे पोलिस. अशा त-हेचा सामाजिक ताबा ठेवला जाण्याला हिंदुस्थानाची तितकी प्रगति झालेली नाही. तिकडे इंग्लंडांतील 'काँटी कौन्सिल' च्या नमुन्याची संस्था अस्तित्वात नाही. शिवाय, पोलीस समाजाचे ताबेदार ही गोष्ट मान्य असलेले, उदात्त व लोकमताचे पुरस्कर्ते असे काही गृहस्थ हिंदुस्थानांत आहेत, तरी वरिष्ठ दर्जाच्या लोकांमध्ये पोलिसाने आपल्याच भजनीं राहा ह्मणजे अर्थातच, बहुजनसमाजाविषयी नुकसानकारक नाहीं तरी, तुच्छपणाची वृत्ति ठेवावी, अशी इच्छा असणारेही पुष्कळ लोक आहेत. काही तर पोलिसांना बाजारांतून जिन्नस आणणे वगैरे, आपली खासगी कामें करण्याला सांगण्यापर्यंत देखील मजल मारतात. वस्तुतः सार्वजनिक सरकारी नोकरांना नित्यशः हिंदुस्थानांत, कमी दर्जाचे हुद्देदार आपला खासगी कामधंदा व व्यवहार करण्याला लावीत असल्याचे नजरेस येते. हिंदुस्थानांतील पोलिसांवर स्थानिक लोकनियुक्त प्रतिनिधींचा ताबा ठेवतां येणें तूर्तच शक्य नसले तरी, हळू हळू ही सुधारणा करता येईल, अशी आशा बाळगणे वावगे होणार नाही. येथे हेही सांगणे अवश्य आहे की, आयर्लंडमधील पोलीस अद्यापि सरकारच्याच ताब्यात आहे, व तें निमलष्करी त-हेचे आहे, यामुळे, त्याचे समाजाशी • संबंध-जे इंग्लंडामध्ये इतके चांगले व फायदेशीर प्रत्ययास येतात ते तेथे कमी प्रमाणांत दिसून येतात. । 'ब्रिटन'मधील कायदे व सामाजिक स्वस्थता यांचे रक्षकपोलीस-यांचे शिक्षण व वर्तन, यांची सर्वतोमुखी प्रशंसाच १०३