पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. पण इंग्लंडांत, मी वर दाखविल्याप्रमाणे, बहुशः याच्या उलट प्रकार असतो. या साऱ्या देशभर पोलिसांचा ड्रेस मुख्यतः अगदी सारखा असतो पण हिंदुस्थानांत शहरोशहरच्या पोलिसचा पोषाख निरनिराळा, ही गोष्टही विशेषेकरून माझ्या लक्षात आली. _____ इंग्लंडांतील हल्लींच्या पोलीस फौजेचा मूळ पाया, सर रॉबर्ट पील यांनी सन १८२९ साली घातला. त्यावरूनच त्यांना 'पीलर्स' आणि 'बाब्बीस' अशी नांवे लोकांनी दिली.. या गोष्टीचे स्मरण झाले म्हणजे मजा वाटते. त्यापूर्वी सामाजिक स्वस्थता राखण्याचे काम 'शेरिफ' लोकांकडे होते व ते फारच असमाधानकारक होत असे. इंग्लंडांतील निरनिराळया 'कॉटी'-प्रांतां–मधील पोलीस, संयुक्त कमेट्यांच्या ताब्यांत आहे. 'कौंटी कौन्सिल' व कौंटीमधील 'जस्टिसेस ऑफ दि पीस' यांच्या सभासदांमधून या कमेच्या निवडल्या जातात. लंडनचे पोलीस खास 'होम ऑफिस'च्या हुकुमतीखाली आहे. खुद्द शहरांतलें पोलीस मात्र तेथील प्राचीन कार्पोरेशनच्या हाताखाली आहे. अशा त-हेनें जनतेचा पोलिसांवर प्रत्यक्ष ताबा राहिल्याने, इंग्रजी पोलीसाला, सामाजिक लोकमताला अप्रतिकूल राहावे लागते, आणि त्यामुळे आपण जनतेचे ताबेदार, ही गोष्ट त्यांच्या ध्यानांत पक्की वागत राहते.