पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचे पोलिस. स्वयंस्फूर्तियुक्त कर्तृत्वशक्तीची उणीव,ही त्यांच्या इंग्रजी व्यवसायबंधूंच्या एतत्संबंधीं गुणांच्या मानाने पुष्कळच कमी आहेत. नेहमी जय्यत व स्फूर्तिवंत राहणे, आणि येईल त्या प्रसंगाला बरोबरीने तोंड देण्याला तयार असणे, या बाबतीत त्यांनी त्यांच्यापासून धडा घेतल्यास फायदाच होईल. इंग्रजी पोलीस जवान, स्वतः समाजाचा ताबेदार आहे, या गोष्टीची जाणीव ठेवून वागतो. तो अनेकवार खरोखरच त्यांचा ताबेदारच नव्हे, तर मार्गदर्शक, तात्त्विक गुरु व परम मित्रही होतो. याची उदाहरणे लंडनच्या रस्त्यांवर रोज पाहण्याला मिळतात. आपले सुस्वभाव 'बाब्बी,' केव्हां केव्हां, केवळ पितृवात्सल्यतुल्य काळजीने एकाद्या लहान मुलाला गर्दीची रहदारी असलेल्या रस्त्याच्या एका बाजूहून दुसऱ्या बाजूला उचलून नेऊन पोहोचवितांना, किंवा परदेशी अनोळखी मंडळीच्या कंपूला विशेष प्रेक्षणीय स्थळांचा मार्ग दाखवितांना, अथवा कोणी वृद्ध गृहस्थ किंवा स्त्री यांना आनंदाने व आदबीने रहदारीच्या चक्करांतून वाट काढीत सुरक्षित जागी नेतांना, असे आढळतात. एकदां कांहीं तात्कालिक अडचणीच्या स्थितीत सांपडलों असतांना मी आपली मोटार थोपवितों न थोपवितों तोंच, एक पोलीस जवान कांही मदत देतां आली तर ती देण्याला मोटारच्या बाजूस येऊन तात्काळ उभा राहिला. अशा स्थितीत हिंदुस्थानांत गाडी सोडून स्वतः पोलीस शिपायाकडे जावे लागते. १०१