पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. कानू यांचा सरंक्षक दुसऱ्या हाताने उलट बाजूच्या वाहनांच्या प्रवाहाला योग्य वळण लावतो. यामुळे रस्त्यावरील रहदारीच्या अडचणी व थोपी-ज्या युरोपभर वरचेवर दिसून येतात त्याआपोआप बंद होतात. या इंग्रजी व्यवस्थितपणाची किंमत विशेष महत्त्वाच्या प्रसंगी अधिक लक्षांत भरते. उदाहरणार्थ, 'प्राइम मिनिस्टर'मुख्य प्रधान यांनी त्यांच्या सरकारी राहण्याच्या ठिकाणी स्वागतपर मेजवानी दिली होती. तेथे एक निमंत्रित पाहुणा म्हणून जाण्याचा बहुमान मला मिळाला होता. त्यावेळी शेंकड्यांनी मोजण्याइतक्या गाड्या आलेल्या. तरी त्यांच्या रहदारीची व्यवस्था पोलिसांनी इतकी उत्तम केली होती की, अडचण किंवा गडबड यांचे नांवनिशाण नजरेस पडले नाही. समारंभ उरकून गेल्यावर थोड्या मिनिटांनी तेथे तो झाला होता असें सुद्धा कोणाला वाटते ना. शहानशहा यांची 'लेव्ही व त्यांनी दिलेला सरकारी 'बॉल' चा समारंभ, बादशहांच्या जन्मदिवसाच्या उत्सवप्रसंगी 'इंडिया आफिस' मधील 'रिसेप्शन' समारंभ, व फ्रेंच प्रेसिडेंट सरकारी त-हेनें लंडनला आले होते, त्या वेळचा समारंभ, हे इंग्लिश पोलिस व्यवस्थेमधील विशिष्टपणा व्यक्त करणारी अप्रतिम चतुराई व उत्तमपणा यांचे निरीक्षण करण्याला तसेच चांगले प्रसंग होते. - अशा प्रसंगी हिंदुस्थानांत खरोखर फारच निराळी तन्हा झाली असती. हिंदी पोलीस जवानांचा उपजत स्वभाव व १००