पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचे पोलिस. मोटारवाल्याकडे धांवला होता, त्याहून कांकणभर अधिकच तांतडीने तो त्याच्याकडे गेला व त्या रेकलेवाल्याशी तितक्याच सभ्यपणाने वागला. हे पाहून माझ्या मनांत तेव्हांच विचार आला की, हिंदुस्थानांतील देशी पोलीसही, दर्जा किंवा स्थितीचा भेदाभेद न दाखवितां, सामान्य जनांशी असेंच सभ्य व आदबशीर वर्तन ठेवितील तर हिंदुस्थान देशाचे भलेच होईल. __ इंग्लिश पोलिसाचा मुख्य गुण, तात्कालिक स्फूर्तीने काम करणे व चाललेल्या प्रकाराचे पाहतांच निदान ठरविणे, हा होय. तेथील भारी रहदारीच्या रस्त्यांवरून चाललेल्या जनसंमर्दाचे त्यांच्या करवी होणारे नियमन, हे स्वस्थ व संथपणाच्या कर्तबगारीचे एक अप्रतिम उदाहरण आहे. त्याच्यामुळेच लंडन येथील रहदारीची व्यवस्था, साऱ्या दुनियेत अप्रतिम म्हणवून घेण्याचा महत्वाचा बहुमान, त्यांनी मिळविलेला आहे. याच्या अगदी उलट पारिस . येथील रस्त्यांची स्थिति दिसून येते. तेथील पोलीस किंवा फौजी लोक, तितके चपल नाहीत. ते रहदारी वाटेल तशी चालू देतात. यामुळे तेथें गलबा व गोंधळ, यांचे साम्राज्य असते. लंडनच्या रस्त्यांवर जो व्यवस्थितपणा दिसून येतो, त्याला जनसमूहाची सहकारिता पुष्कळ महत्त्वाची व कार्यसाधक होते, हे खरे. 'रॉबर्ट्स'ने ( पोलीस जवानाने ) हात उचलण्याचा अवकाश, की एका बाजूची रहदारी तात्काळ बंद करणारी जणों जादूची कांडीच फिरली. इतक्यांत तो सामाजिक व्यवस्था व हुकुमत आणि कायदे.