पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. रांत लंडनचे काही पोलीस, बुद्ध्या मागवून, त्यांच्याकडे रस्त्यावरील रहदारीचा बंदोबस्त सोपविला गेला होता; त्यावेळी मी त्यांना पाहिले होते. या साऱ्या लोकांमध्ये चपलपणा हा गुण विशेष वळणी पडलेला असतो, असें महशूर आहे. त्याला अनुसरून स्टेशनावरील पोलीस जवान, आम्ही नवखे व परकी हे ताडून, तात्काळ मदतीला आला; व त्याने गाडी-वगैरे हवी कां याची चौकशी केली. एक गाडी बोलावून त्याने गाडीवानाला आम्हांला कोठे न्यावयाचे ते समजावून दिले, व आमची यासंबंधे तसदी चुकविली. वास्तविकपणे अगदी प्रारंभापासून मला, पोलीस सतत व खात्रीनें भारी उपयोगी पडले. त्यांना पुष्कळच व भारी जबाबदारीची कामें असली, तरी सामान्य जनतेशी सभ्यपणे वागून, त्यांच्या उपयोगी पडण्याला त्यांना फुरसत मिळते. त्यांच्या मदतीची आवश्यकता लागल्यास सर्वाशींच सभ्यपणा व भलेपणा दाखविण्यांत, ते श्रीमंत गरीब, थोर किंवा सामान्य जन, असा भदाभेद करीत नाहीत. याचे एक उदाहरण मी स्वतः पाहिले. एकदा मी मोटारमधून चाललों असतांना एक पोलीस जवान पायरस्त्यावर उभा असलेला दिसला. तितक्यांत एका गृहस्थाने काही माहिती विचारण्यासाठी आपली मोटार थोपविली. तसा तो जवान, त्याचा भाव ताडून, चटकन् त्या मोटारजवळ पोहोचला, व त्या गृहस्थाला हवी असलेली माहिती देऊन तसाच परत जाऊन उभा राहिला. त्यानंतर लगेच एका खटारेवाल्याने त्याला हटकले. तसे त्या श्रीमान्