पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग नववा. लंडनचे पोलिस. लंडनच्या पोलिसांची कीर्ति दूरवर व सर्वतोमुखी झालेली आहे. या ब्रिटिश राजधानीमध्ये येणाऱ्या परकी लोकांचें लक्ष अवश्यमेव आकषर्ण करणारी अशी ती एक अजब व ठळक चीज आहे. जाहिराती व सचित्र पोस्टकार्डे, यांच्यावर काढलेल्या या पोलीस जवानाच्या चित्रांत, तो धिप्पाड व भकम शरीरकाठीचा-बांध्याचा दाखविलेला असतो. आदब व अक्कल यांचा तो जणों पुतळाच, अशी त्याची कीर्ति आहे. ती अवास्तव आहे असे मुळीच नाही. .. हिंदुस्थानांतील पोलिसांचा आम्हांला अनुभव आहे. त्या मानाने लंडनमधील 'बाब्बी'–पोलीस जवान त्याच्या नित्याच्या परिस्थितीमध्ये कसा काय असतो, ते पाहण्याचा प्रसंग येण्याची मला बरीच जिज्ञासा, किंबहुना हौस, होती. तो प्रसंग 'व्हिक्टोरिया' रेलवे स्टेशनावर पोहोंचतांच प्रथम आला. मी त्याच्याकडे बराच वेळ न्याहाळत राहिलो. राज्यारोहणासंबंधाच्या दिल्लीदरबा