पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुढाकार घेऊन यश मिळविले आहे. तशा त-हेच्या बऱ्याच पतपेढ्या त्यांनी आपल्या संस्थानांत स्थापन करविल्या आहेत. दक्षिणेतील सरदारांच्या वतीनें, ते गेली चौदा वर्षे मुंबईसरकारच्या कायदेकौन्सिलामध्ये प्रतिनिधी होते. युरोपांतील हा त्यांचा पहिलाच प्रवास असून, हे लेख तद्विषयकच आहेत. त्यांनी हिंदुस्थान व मलाया द्वीपकल्प यांमध्ये पुष्कळसा प्रवास केलेला आहे. ते जेथे जात तेथें नजरेस पडलेल्या गोष्टी व अनुभविलेले प्रसंग यांच्या सूक्ष्म निरीक्षणाच्या कामी ते आपल्या नेत्रांचा व बुद्धीचा चौकसपणें उपयोग करीत. इंग्रजी भाषण व लेखन यांच्यामध्ये त्यांची पारंगतता वर्णनीय आहे. मुंबई इलाख्यांतील डायरेक्टर ऑफ अग्रिकल्चर, मेहेरबान जी. एफ्. कीटिंग, सी. आय. ई., यांनी लिहिलेल्या "रूरल इकॉनमी इन् दि डेक्कन' आणि लॉर्ड सिडेनह्याम, मुंबईचे गव्हर्नर, यांची मरहूम कन्या, मिस् व्हायोलेट क्लार्क, यांच्या 'लीव्हस्' नांवाच्या स्फुट कविता व गोष्टी, या पुस्तकांची भाषांतर करून त्यांनी ती महाराष्ट्रांतील लोकांसाठी प्रसिद्ध केली आहेत. ईस्ट इंडिया असोशियेशन पुढे त्यांनी ता. २३ जून स० १९१३ रोजी, 'ब्रिटनने हिंदुस्थानासाठी काय केलें आहे ? या विषयावर एक वर्णनीय निबंध वाचला. एशियाटिक रिह्यच्या जानेवारी स० १९१४ च्या अंकामध्ये त्यांनी 'ए प्ली फॉर दि मराठा ब्राह्मण,' हा लेख उभयपक्षी असलेला गैरसमज व दुजाभाव नाहींसा-निदान कमी करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध केला आहे. ते उच्च वर्णाचे महाराष्ट ब्राह्मण असल्याने त्यांची मते महत्त्वाची व विचारणीय आहेत. कारण ब्रिटिश राज्यकत्यांनी ज्या तद्देशीय व महान् राजांची राजसत्ता हिरावून घेतली अशांपैकी शेव टचे राजे लोक त्यांच्या जातीचे होते. अशा उच्च कुळांत त्यांचा जन्म झालेला व परस्थिति वर वर्णन केल्याप्रमाणे असल्याने त्यांच्या मताला विशेष जोर येणे योग्यच आहे. हिंदुस्थानांत आजकाल स्थापित असलेल्या ब्रिटिश राज्यसत्तेविरुद्ध पुष्कळ प्रांतांमध्ये बरीच प्रतिकूलता व