पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांची मनोरंजनाची साधनें. इंग्लंडांत स्त्रियांची जी प्रगति झालेली आहे तिचें, खास त्यांच्याचसाठी स्थापन झालेल्या क्लबांवरून उत्तम निदर्शन होते. अशा क्लबांमध्ये, 'अलेक्झांडा लेडीज क्लब'अलेक्झांड्रा राणी त्याच्या पेट्रनेस (मुख्य साहाय्यकर्त्या) असल्यावरून हे नांव पडले आहे- 'दि पायोनिअर लेडीज क्लब,' 'दि लेडीज आर्मी अँड नेव्ही क्लब,' 'दि लेडीज अथीनियम्' व अखेर पण त्याच्या जागरूक कर्तबगारीत महत्त्वाच्या मानाने कमी नव्हे असा, 'दि सफरेजिटस' या नांवाने जास्त प्रसिद्ध असलेला 'दि विमेन्स सोशल अँड पोलिटिकल युनियन', हे क्लब होत. या विवेचनावरून, सामाजिक विषयासंबंधी केंद्र आणि राजकीय चळवळीच्या विस्ताराचे साधन या नात्याने क्लबांना एक विवक्षित स्थान मिळालेले आहे. अलीकडे त्यांचा प्रसार व त्यांची वाढ यांविषयी खरोखर कांहीं जागी नाराजी व नापसंती दिसूं पाहात आहे. कारण, या क्लबांच्या संस्थेमुळे जुन्या पद्धतीचे कौटुंबिक जीवन व राहणी-ज्यांच्याविषयी आज पिढ्यानपिढया इंग्लंडाला अभिमान बाळगण्याजोगी स्थिति प्राप्त झालेली आहे त्यांचा अगदीच नाश नाही तरी, निदान त्यांच्यांत बरीच खडबड होण्याची चिन्हे आहेत, असें मत होत चालले आहे. क्लबाच्या त-हेची राहणी हिंदुस्थानांत कधी काळी प्रस्थापित होईल किंवा नाही, ते अद्यापि निदर्शनास यावयाचे आहे. तसे घडून आलेच तर, त्यापासून कौटुंबिक