पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. वेताच्या खर्चात मिळू शकतात. पण इतर जास्त थाटदार क्लबांमध्ये खर्चाचे मान विशेषच संपन्न लक्ष्मीपुत्रांच्या शिवाय इतरांना झेंपण्यासारखे नसते. काही क्लबांमध्ये विशिष्ट प्रकारचा विलगपणा असतो. 'कार्लटन', 'न्याशनल लिबरल', 'दि रिफार्म,' 'कॉन्स्टिटयूशनल,' वगैरेमध्ये असा प्रकार आहे. त्यांच्या नांवानुरूप सार्वजनिक प्रश्नांच्या संबंधांत विशिष्ट मतें असलेल्या लोकांसाठी ते जिनसांचा पुरवठा करितात. इकडील लोकसमाजाच्या इतर तन्हांचे निदर्शक असे दुसरेही क्लब आहेत. 'अथीनियम' याच्यांत ललितकला, वाङ्मय व निरनिराळी शास्त्रे यांच्याशी संबंध असलेले लोक, ' दि आर्मी अँड नेव्ही' याच्यांत बादशाही लष्करी व आरमार खात्यांतील अमलदार लोक, 'दि आक्सफोर्ड अँड केंब्रिज' यांत या दोन्ही युनिव्हर्सिट्यांमधील मंडळी, 'दि ग्यारिक' यांत नाट्यकला व रंगभूमीसंबंधी मंडळी अशा त-हेचे लोक असतात. 'दि रॉयल याट' व 'आटोमॉबिल क्लब' यांचे उद्दिष्ट हेतु त्यांच्या नांवावरूनच व्यक्त होत आहेत. - कामकरी मंडळीचेही सामाजिक व राजकीय क्लब्स् आहेत. ते बहुतेक मोठ्या गांवांत व पुष्कळशा खेड्यांमधूनही आढळतात. ते बहुतांशी प्रजासत्तात्मवादी असून, त्यांच्यामधील वातावरण व्यक्तिस्वातंत्र्य व सलोखा यांनी आक्रमिलेले असते. वरील प्रकार विशेष संपन्न क्लबांमध्ये बेताचाच आढळतो.