पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांची मनोरंजनाची साधनें. तात इतकेच नव्हे, तर त्यांच्यांत उत्तम सजविलेल्या,निजण्याच्या, कपडे करण्याच्या, स्नानाच्या, वगैरे कोठड्याही असतात. अशा रीतीने त्यांच्यांत सामाजिक दळणवळणाची साधनें व हॉटेलांतील सोई दोन्ही एकत्र सांपडतात. तेथें मधून मधून व्याख्याने व इतर करमणुकीचे प्रकारही चालतात. आणि सार्वजनिक मेजवान्या व गमतीचे मेळे होतात. __या क्लबांचा पूर्ण फायदा घेतला जातो. खरोखर राजकीय व सामाजिक दृष्टीने पाहूं जातां या फारच उपयुक्त व फायद्याच्या संस्था आहेत. सामाजिक संबंधाने परस्पर भेटी व ओळखी होण्याला ते फार सोईचे पडतात. तेथें मित्रमंडळी भेटतात व आपापले विचार प्रगट करतात. जोराचे व हितकारी लोकमत तयार करण्याला त्यांचा उत्तम उपयोग होतो. राजकीय स्वरूपाचे जे क्लब आहेत त्यांचा उपयोग विशिष्ट राजकीय पक्षाचे निरनिराळे सभासद एकत्र व एक विचाराने राहण्यासाठी, परस्परांच्या ज्या मतज्ञानाची आवश्यकता आहे त्या ज्ञानाचे संवर्धन करण्याकडे आणि परस्परांमधील एकीची भावना दृढतर करण्याकडे होतो. खर्चाच्या बाबतीत जपणूक व काटकसर, या गोष्टी सहकारी तत्त्वावर चालविल्या गेलेल्या संस्थांचा मुख्य फायदा समजला जातो. तो या क्लबांमध्ये कितपत मिळू शकतो, याविषयी मतभेद आहे. यांतील काही जुन्या संस्थांमध्ये मध्यम प्रतीच्या हॉटेलांप्रमाणेच रोजच्या राहणीला लागणाऱ्या सोई व ऐषआरामाची साधने ९३