पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. आहेत. वाचनालये केवळ कामकरी लोकांनाच अप्रतिम देणगीसारखी आहेत असे नसून, मध्यम सुखवस्तु लोकांनाही तो एक अलभ्य लाभसा आहे. तेथे सर्व वर्गाचे व प्रतीचे लोक जातात. सामान्य जनतेची सार्वजनिक अड्डयाची जागादारूचा पिठा—याचा रामबाण उतारा, तसेंच वरिष्ठ दर्जाचा सुखानंद प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्नास उत्तेजन देणारी साधनें या नात्याने ती अभिनंदनीय आहेत.अशा संस्था माझ्या देशांतही स्थापल्या गेल्या तर मला फार पसंत होईल. ___ लंडन मधील सामाजिक जीवनाचें, 'क्लब' हे एक महत्त्वाचे उपलक्षण झालेले आहे. हिंदुस्थानांत युरोपियन रहिवाशांशिवाय इतरांना या संस्था, इंग्लंडांत त्या ज्या अर्थाने समजल्या जातात व वास करतात, तशा मुळींच माहीत नाहीत, मटले तरी चालेल. मुंबईसारख्या मोठ्या शहरांत 'इंडियन क्लब्स्' आहेत.पण त्यांचा सभासदपणा संकुचितसा असून त्यांना लोकाश्रयही विशेष नसतो. तेथे सायंकाळी फार तर काही थोडे खेळ खेळण्यापुर्ती सोय असते. यापलीकडे त्यांचे फारसें महत्त्व असत नाही. इंग्लंडांत सुखवस्तु मंडळीचे क्लब्स् मोठ्या प्रमाणावर व त-हेत-हेच्या सोईंनी युक्त असतात. तेथें सुरेख व पुष्कळ सामान असलेली आरामदायक क्रीडास्थळे, लूंजेस् , बिलियर्ड रूम्स, चहा, उपाहार किंवा भोजन करण्या-घेण्याच्या जागा, सर्व त-हेनें परिपूर्ण लायऱ्या, लिहिण्याच्या जागा, इत्यादि करमणुकीची व सुखासमाधानाची विपुल साधने अस ९२