पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांची मनोरंजनाची साधनें. राष्ट्रीय प्राचीन वस्तू व इतर हरत-हेचे नमुनेदार पदार्थ यांचे हे जणों अनमोल भांडार आहे.त्यांच्यांत प्राच्य भागासंबंधाचीही 'एक अत्युत्तम शाखा आहे. तसेच 'वॉलेस कलेक्शन' -याच्यांत सुरेख सामानसुमान, लहान मोठ्या तसबिरी, चित्रं, चिनी व पार्सिलेनचे सामान, जुनी चिलखतें, वगैरेंचा भरणा आहे. 'व्हिक्टोरिया ऑल्बर्ट म्यूझियम'च्या हिंदी शाखेत, शहानशहा व महाराणी यांच्या स्वाऱ्या दिल्ली दरबारासाठी गेल्या वेळी, त्यांना मिळालेली मानपत्रे व नजर झालेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत. 'टॉवर आफ् लंडन'-लंडनचा किल्ला-याचाही उल्लेख होणें अवश्य आहे. कारण, तीही एक प्रदर्शनाप्रमाणेच प्रेक्षणीय जागा आहे. त्याच्यांत गोल जिने, विलक्षणसे कमरे व कोठड्या आहेत. त्यांतीलच एकांत बादशाही जवाहीर, लोखंडी गजांच्या पिंजऱ्यात ठेवलेले आहे. त्याच्यावर सक्त पाहरा असतो. याशिवाय कायमची अशी चित्रांची प्रदर्शनें 'न्याशनल ग्यालरी,' 'दि टेट ग्यालरी,' "दि न्याशनल पोर्टेट ग्यालरी' आदिकरून बरीच आहेत. "मॅदाम् टुस्सो'चे प्रदर्शनहीं विसरण्याजोगें नाही. त्याच्यांत इंग्लंडच्या इतिहासासंबंधी गोष्टी प्रत्यक्षवत् घडलेल्या पाहण्यास सांपडतात. त्यांतील राजपुरुषांचे समूह, तसेंच राजा व राणी सिंहासनारूढ झालेले पाहून, मला दिल्ली दरबाराचे स्मरण झाले. ___ लंडनमधील प्रत्येक ड्रिस्टिक्टमध्ये फ्री पब्लिक रीडिंग रूम्स लायब्ररी, सार्वजनिक मुफत पुस्तकालये व वाचनालये