पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. की, या विषयांसंबंधाने उपनिषदांमध्ये निबद्ध असलेल्या शिक्षणाच्या सत्यतेचे, त्यांतील लोकांना प्रत्यंतर खास येईल. सर्वसामान्य जनतेच्या करमणुकीचे काही प्रकार बोधप्रद व मानसिक उन्नति प्राप्त करून देणारे आहेत. त्यांच्यांत बोध व शिक्षण एकवटलेले असते, हे लक्षात ठेवणे अवश्य आहे. या कोटीपैकींच लंडन येथील ' झु'-प्राणिसंग्रहालय आहे. तें आमी पाहिले. अशी स्थळे हिंदुस्थानांतही आहेत, हे खरें. पण ती याच्या इतकी विस्तृत नाहीत, किंवा तेथील व्यवस्था व मांडणही तितकी चांगली नाही. हिंदुस्थानांत अज्ञात असे शीतकटिबंधांतील पशू तेथे आमी प्रथमच पाहिले. त्यांचे आझाला मोठे कौतुक वाटले. पूर्वदिग्भाग सोडून निघाल्यापासून प्रथमतःच येथे हिंदुस्थानी बैल व गाय पाहण्यास सांपडल्याने आमाला आनंद झाला. आमच्या विशेष लक्षांत भरणारी अशी दुसरी एक चीज मोकिंग बर्ड'–चेष्टखोर पक्षी-ही होय.तो माणसाच्या आवाजाची हुबेहूब नकल करितो. सष्टपदार्थविज्ञानशास्त्रापैकी प्राणिजीवनशास्त्राचा सर्वोत्कृष्ट वस्तुपाठ देणारा असा हा सारा संग्रह आहे .शिक्षक लोक शाळेतील मुलांचे थवेच्या थवे शिक्षण देण्यासाठी उन्हाळ्यांत या 'झू'मध्ये घेऊन जातात, असे मला कळले. लंडनमध्ये ' म्यूझियम्स'-पदार्थसंग्रहालये-यांचा केवढा तरी जणों खजीना आहे. त्यांच्यांत 'ब्रिटिश म्यूझियम' प्रमुख आहे.