पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांची मनोरंजनाची साधनें. आपण आपली मानसिक स्थिति एखाद्या वस्तूपासून सुखसमाधान होण्यायोग्य बनविणार नाही तोंवर, ती वस्तु आपल्या स्वाधीन आहे इतक्यावरूनच केवळ तिच्यापासून होणारे सुख आपणांला मिळेल, असे मुळीच नाही. उदाहरणार्थ, भूक लागली असल्याशिवाय खाद्य पदा ांना हरत-हेनें रुचि आणल्यानेही ते गोड लागतील, असें नाही. निद्राविनाशरोगग्रस्ताला, कितीही मऊ बिछाना व उशागिरद्या यांनी झोप आणणे शक्य नसते.उत्तमोत्तम गायनवादनसुद्धा ऐकण्याची लहर नसेल तोवर, ऐकणारापुढे पुष्कळ अंशी व्यर्थ होते. जीवनसंबंधी गरजा होईल तितक्या कमी करण्यानेच खरे सुख व समाधान प्राप्त होते, त्या वाढवीत जाऊन प्रत्येक गरज भागवति जाण्याच्या यत्नांत राहिल्याने नव्हे,हे तत्त्व युरोपांतील तरुण व नवीन राष्ट्रांना अद्यापि शिकावयाचे आहे. एका वस्तूचा हव्यास व लालसा तृप्त होते न होते तोंच, त्या दुसरीविषयीं उत्पन्न होतात. त्यांची पूर्तता व्हावी न व्हावी तोवर कांही निराळ्याच गोष्टीविषयीं भूक लागते. विषयांतर करीत मी एक उपदेशपर प्रवचनच करूं लागलों, याबद्दल वाचक मला क्षमा करतील. मी सांगू इच्छितों तें इतकेच की, युरोपाला संपदा व समृद्धि यांचा दीर्घ व आकंठ उपभोग घडल्यानंतर खचित आपोआप अशी एक वेळ येईल