पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. सर्व बाबींप्रमाणे यांत धोका आहे तो त्याच्या अतिरेकामध्ये. यावरून पाश्चात्यांच्या जीवनक्रमामध्ये करमणुकी व खेळ तमाशे, जो पुष्कळसा भाग व्यापतात, त्याविषयी विचार करणे मला इष्ट वाटते. मी हिंदुस्थानासारख्या गरीब देशांतून आलेला. युरोपांतील इतर देश व इंग्लंड, यांमध्ये दृष्टीस पडणारी असंख्य थिएटरें-नाटकगृहे,-नृत्यगायनशाला, व चित्रप्रदर्शनशाला, आणि त्यांना प्रत्येक रात्री उदार आश्रय देणारी मंडळी पाहून पुढील अनुमान काढल्याखेरीज माझ्याच्याने रहावेनाःया बाबतींमध्ये द्रव्य, वेळ व मानवी शक्ति यांचा निष्कारण दुरुपयोग होतो. याहून पष्कळच अधिक फायदेशीर व उपयोगी उद्योगांच्या मार्गामध्ये या साऱ्यांचा विनियोग खचित करता येण्याजोगा आहे. सायंकाळचे खेळ तमाशे, व गमती उपयोगी असून, लोकांना जास्त विशंकनीय करमणुकीच्या मागापासून अलग ठेवण्याला त्यांचा काही अंशी फायदा होतो, असेही म्हणता येईल. पण त्यांच्यांत अतिरेकानें निमग्न होणे अपायकारक आहे. असल्या चैनबाजीच्या करमणुकीकडे लोकांची कमी प्रवृत्ति झाली तर, राहणीच्या खर्चाचे मानही कमी होईल. सामाजिक सुधारणा करू इच्छिणारांना हे एक चांगलेच काम आहे. आराम व सुखसमाधान, ही बाह्य स्थितीपेक्षा आंतर किंवा मानसिक स्थितीपासूनच विशेषेकरून प्राप्त होतात, हे सुवर्णतुल्य तत्त्व युरोपाला अद्यापि शिकावयाचे आहे. ८८