पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांची मनोरंजनाची साधनें. ल'ची ' म्याच' पहात राहण्यांत, अर्थातच मोठासा अवगुण आहे असे नाही. तरी पण या खेळांत जुगाररूपी पिशाचिका कमी अंशाने प्रवेश करते असे नाही, हे ऐकून मला वाईट वाटले. या जुवेबाजीने चोख व आरोग्यप्रद खेळाला बट्टा लागतो. या दुष्परिणामी परिस्थितीचा उच्छेद होणे अवश्य आहे. या अवलक्षणाच्या महत्त्वाकडे सरकारचेही लक्ष वेधले असून पैजेसंबंधाचा कायदा नुकताच जास्त कठिण व प्रतिबंधक केला गेला आहे, ही गोष्ट समाधानकारक आहे. सर्व खऱ्या विचारी लोकांना, हे बरे झाले, असेंच वाटते आहे. पैजेच्या पुष्टीकरणार्थ असें,कांहीं एक सांगतां येण्याजोगें नाही. तिच्यामुळे खेळाची नासाडी होते-खेळ म्हणजे नुसते मानसिक प्रोत्साहन, एवढाच अर्थ घेणे असेल तर निराळे. इतकेच नव्हे, तर त्याच्या पायीं अनेक लोक धुळीस मिळतात. ___ बाहेर मोकळ्या हवेत खेळण्याची व परिश्रम करण्याची आवड ब्रिटिश जनतेमध्ये उपजत असल्याचे दिसून येते.इंग्लंडांत अशा आरोग्यप्रद खेळ तमाशांसाठी साधने उपलब्ध आहते, तशीच ती हिंदुस्थानांतील लोकांसाठीही उपलब्ध केली जावी, असे मला फार वाटते. या योगाने लोक कदाचित् कमी आळशी होतील व त्यांची शारीरिक व नैतिक घडण अधिक बलवान् होईल. खेळ निरुपद्रवी आहे इतकेच नव्हे पण त्याची दिशा योग्य असली तर तो फायदेशीरच होतो, व त्यामुळे रोजचे कामकाज करण्याला मनुष्य जास्त योग्य होतो. इतर 210