पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. लोकांची कल्पना याहून विस्तृत असते. या ठरलेल्या साप्ताहिक निमसुट्टीच्या दिवशी ते लोक अतिशयच मोठ्या प्रमाणावर एकत्र जमून, त्या त्या दिवसमानानुरूप, क्रिकेट, फूटबाल, टेनिस, हॉकी, यांच्या म्याचेस ( सामने ) पहात राहतात.. एखादी ' फूटबॉल कप फायनल म्याच' पाहण्यासाठी एकाच वेळी, एकाच जागी, लाख लाख माणसें जमणे विरळा घडतें. असें नाही. अशा त-हेच्या या जीवनचरित्रामध्ये काही लोक राष्ट्रीय हासाच्या प्रादुर्भावाची दुश्चिन्हें होताहेत असे समजतात. असें निब्बळ तमासबीन होऊन गंमत पहाण्यापेक्षा, जमलेल्या सर्व मंडळीने त्या तशा खेळांत सामील होण्याची तजवीज झाली तर, त्यांच्या शरीरबलावर जास्त चांगला परिणाम होईल, असे ते प्रतिपादन करितात. कामकरी मंडळींसंबंधाने हे जे ह्मणणे आहे, तेंच वरिष्ठ प्रतीच्या लोकांविषयीही थोड्याशा फरकानें खरे आहे. चाललेल्या शर्यती पाहात उभे राहण्यापेक्षा सरदार मंडळी ' जाकी'-चाबुकस्वार-याच्या ऐवजी स्वतः आपापल्या घोड्यांवर बसून दवडतील तर जास्त चांगले, हे निःसंशय होय. ही करमणूक या सरदार मंडळीच्या स्वतःच्या प्रकृतीला जरी अधिक चांगली असली तरी यांच्यापैकी पुष्कळांच्या घोड्यांना मात्र ती तितकी श्रेयस्कर होणार नाही. मोठमोठ्या लोकांच्या अशा प्रचंड समूहांनी मनाला हुरूप व उत्तेजन देणारी एखादी चांगली क्रिकेट' ची किंवा 'फुटबॉ