पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इंग्रज लोकांची मनोरंजनाची साधनें. वेळी आरामांत व खेळतमाशांत गढून जाण्याची त्यांच्या अंगची उपजतशक्ति ही होय. एखाद्या लोकप्रिय क्रिकेट मॅचला किंवा फूटबाल मैचला हजर राहतांच, ब्रिटिश लोक विश्रांतीची वेळ येतांच कामाकाजाची काळजी कशी पार झुगारून देतात, हे कोणाच्याही तेव्हांच लक्षात येईल. केवळ लंडनमध्येच नव्हे, तर या राज्यांतील प्रत्येक शहर, गांव व खेडे यांच्यामध्ये, शनिवारी तिसऱ्या प्रहरापासून मजूर व कामकरी यांचा सुट्टीचा दिवस असतो. व सारी आफिसे, लहान मोठे कारखाने व गिरण्या बंद होतात. तेव्हांपासून सोमवार सकाळपर्यंत साऱ्या लोकांमध्ये खेळ, तमाशे व आरामाची साधनें, यांचे साम्राज्य सर्वत्र पसरते, व जिकडे तिकडे लोक सुखोपभोग व गंमत यांमध्ये निमग्न होतात. काही लोक — पास '-उपवनां-मध्ये आराम घेण्याला जातात. तेथे त्यांना नाना त-हेचे खेळ तमाशे, फुकट किंवा नांवाला थोडीशी फी देऊन, पाहण्याला मिळतात. तसेच तेथें, हवा चांगली व सोईवार असली तर, पुष्कळसे लोक, नुसतेच गमतीने इकडे तिकडे फिरत राहतात, किंवा बैठकींची व्यवस्था केलेली असते त्यांवर अथवा वृक्षच्छायेखाली बसून वाचनांत काळ घालवितात. हिंदुस्थानामध्ये अशा त-हेनें फिरत व सहज वेळ काढण्याचा प्रघात नाही. तिकडील लोकांची करमणूक म्हणजे तमाखू पीत आपसांत चकाट्या पिटांत राहणे एव्हढीच. करमणूक व सुखोपभोग, यांविषयींची इंग्रज