पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग आठवा. इंग्रज लोकांची मनोरंजनाची साधने. नेपोलियननें इंग्लिश लोकांना ' बनियांचे ( दुकानदारांचे ) राष्ट्र' असा किताब दिलेला होता. 'लिटल कार्पोरल ' (नेपोलियनचा बांधा ठेंगू असल्याने त्याला हे नांव पडले होते. ) च्या लक्षांत इंग्रज लोकांची उत्कट सुखोपभोगेच्छा आली नाही, किंवा तिकडे त्याचे दुर्लक्ष झाले, असे दिसते. माझ्या या सफरीमध्ये मला, हे लोक कामकाज करीत असतांना व त्यांचे खेळ तमाशे चालले असतांना दोन्ही स्थितीत पाहण्याला सांपडले. तसे त्यालाही सांपडते तर, त्याने आपलें मत खचित बदलून, त्यांना उत्सवप्रिय व तमासबीन मंडळीचे राष्ट्र, असें झटले असते. कामधंदा करणे व त्याच्यांत गढून जाणे, तसेंच फुरसत काढून त्या वेळांत आरामांत व सुखोपभोगांतही कांकणभर अधिकच मग्न होण्याची या लोकांची शक्ति, त्याच्यासुद्धां लक्षात आली असती. कामकाजामधील त्यांच्या निमग्नतेहून श्रेष्ठतर गोष्ट मटली म्हणजे फुरसतीच्या