पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचा आसमंतात्-भाग. जयघोष केला जातो. राजा व राजघराण्यातील मंडळी यांच्यासंबंधाने सर्व लोक नेहमी आदराने बोलतात. बहुतेक साऱ्या सार्वजनिक प्रसंगांच्या शेवटी राष्ट्रगीत-न्याशनल आंथेमगायले जाते. प्रत्येक गायनवादनशाळा ( कान्सर्ट हॉल ) नाटकगृह (थिएटर) आणि मनोरंजनाचे हरएक स्थळ, यांतील प्रत्येक प्रयोगाचा शेवट व्हावयाचा तो, त्याच गीतानें, राष्ट्रगीत चालले असतांना सर्व लोक उभे राहतात व दाराबाहेरचे लोक तें कानी पडतांच टोप्या काढतात. पण मनोरंजनाच्या स्थळामध्ये थोडेबहुत लोक अशा त-हेने योग्य सन्मान व संभावितपणा दाखवीत नसलेलेही मी पाहिले व त्यांचे मला वाईट वाटले.