पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. विषयी पूज्यभाव दाखविणे, यांचे ब्रिटिश लोकांमध्ये उपजतच अंगवळणसें पडले आहे, हे पाहून मला समाधान व आश्चर्य वाटलें. आमी मोठे राजनिष्ठ ह्मणून भारी अभिमान बाळगितों, आणि राजे व बादशहा यांच्याविषयीं शक्य तितका सर्वोत्कृष्ट आदर व पूज्यभाव ठेवतो. पण आमची राजनिष्ठा अभावदर्शक अथवा निष्क्रियारूप होय. शहानशहांच्या हुकुमास शिरसा मान देण्याचे काम साहजिक घडून जाते. आज्ञा झाली, तर प्रत्येक हिंदी सद्गृहस्थ, राजासाठी प्राणही अर्पण करील; तथापि इंग्लंडांत आपल्या नृपतीशी सहकारीपणाने, वागण्याची जी प्रवृत्ति प्रजाजनांमध्ये आढळून येते, ती आमच्या देशांत नाही. त्या देशांतील राजनिष्ठा आमच्या इकडच्या, पेक्षा अधिक मूर्त स्वरूप धारण करते. हिंदुस्थानांत लष्करी परंपरा असलेले सरदार व थोर, प्रतिष्ठित लोक, पूर्वकाळी, राजाचा मान व दबदबा जतन करणे हे मुख्य कर्तव्य मानीत असत. पण सामान्य जनसमूह तेव्हां व आताही, या गोष्टी. ईश्वराधीन आहेत, या कामावर नेमलेल्या लोकांचेच ते काम, आहे, आणि सरकारी अंमलदार या कामी पुर्ती नजर ठेवतील असा विश्वास बाळगतां येण्याजोगा आहे, असेंच समजून होते व आहेत. इंग्लंडांत लोक राजनिष्ठ आहेत ते त्यांच्या अतःकरणप्रवृत्तीनुरूप. त्यांची राजनिष्ठा जागरूक व कार्यकर्ती आहे. राजा जेथे कोठे जाईल, तिकडे त्याचा उत्साहपूर्वक व जोराने