पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचा आसमंतात्-भाग. योगी, असे घोडे व गरीब पण उपयोगी गाढवें, यांचे पृथक् पृथक् वर्ग ठेवण्याची योजना केलेली होती. • रॅनले कब् ' मधील घोड्यांच्या मेळ्यांत उड्या मारण्याचे अप्रतिम काम पाहण्यात आले. तेथेच ‘मोटार पोलो'ची शर्यत पाहिली. तिच्यांत खेळणारे लोक, मोटार गाड्या किती तरी व्यवस्थित व सफाईदार फिरवीत होते. ते पाहून अचंबा वाटला. त्या सर्व गाड्या 'फोर्ड'च्या बनविलेल्या होत्या. __फ्रेंच प्रजासत्ताक राज्याचे अध्यक्ष एम्. पाँकारी, सरकारी रीतीनें, उन्हाळ्यात लंडनला आले होते. त्यांचा स्वागतसमारंभ अगदी बादशाही थाटाचा झाला. शहरांत मैलोंगणती रस्त्यांवर ध्वजपताका, कमानी, विजयतोरणे, वगैरेंच्या द्वारें सुंदर शोभा आणलेली होती, व जागजागी अन्वर्थक व स्वागतपर वाक्ये फडकत होती. मिरवणुकीच्या रस्त्यावर प्रेक्षकांची चिकार गर्दी झालेली होती. या थोर व भाग्यशाली पाहुण्याच्या स्वागताप्रीत्यर्थ शहरांतील सारी वस्तीच जणों बाहेर पडली होती. इंग्लंडांत लोकसत्तात्मकराज्यपद्धतिप्रिय लोक विशेष. त्या मानाने राजे व शहानशहा झणजे, एक वंशपरंपराप्राप्त प्रेसिडेंट, इतकेच लोक समजत असतील, अशी माझी समज होती.. पण आम्हां हिंदी लोकांप्रमाणेच, राजा व राजघराण्यातील माणसे यांना मान देणे, व त्यांच्या