पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माझा विलायतेचा प्रवास. वाढावी, व फौजेत भरती होण्याला उत्तेजन मिळावे ह्मणून हे प्रदर्शन करविण्यात आले होते. त्याच्यांत लहान लहान प्रमाणावर मनवारी व लढाऊ जहाजे, लोहकवचयुक्त आगगाड्या, इस्पितळांच्या गाड्या, फौजी इस्पितळे, युद्धविषयक सर्व शस्त्रास्त्रे व अवजारे, वगैरे ठेवलेली होती. शिवाय, तेथे लष्करी ब्यांड-बाजेही फारच उत्कृष्ट चालू होते. 'वाटर शूट' किंवा पाण्यांतून उंचावरून वाहात येण्याचा तमाशा, व पुष्कळसे किरकोळ खेळ तमाशेही सुरू होते. आरमारांनी केलेल्या तोफेच्या भडिमाराची प्रतिकृतीही दाखविली जात होती. ती मन खडबडावून सोडणारी असून, तिच्या योगाने या देखाव्याला युद्धप्रसंगाचे मूर्त स्वरूप प्राप्त होई. ' आलिंपिया' मध्ये सार्वराष्ट्रीय घोड्यांचे प्रदर्शन भरलें होते. त्यांतील पुष्कळशा तमाशांमध्ये 'फायर ब्रिगेड'-आग विझविण्याचे काम करणारी मंडळी यांच्या शर्यतीही होत्या. पुढे त्याच अवाढव्य इमारतीमध्ये वार्षिक ' सार्वराष्ट्रीय मोटार शो' किंवा मोटारगाड्यांचे प्रदर्शनही झाले. ' रिचमंड ' येथील घोड्यांच्या प्रदर्शनालाही आली गेलो होतो. त्याला बादशहा क महाराणीसाहेबही आले होते. 'आलिंपिया' व 'रिचमंड',. दोन्ही ठिकाणी उड्या मारण्याच्या उत्तम शर्यती चालू होत्या. त्यांत कानाडामधील घोडे विशेष शिकवून तयार केलेले होते.. 'रिचमंड ' येथील प्रदर्शनांत सर्व त-हेच्या घोड्यांचे नमूने. होते. तेथे शिकारीच्या कामाचे, व व्यापारी लोकांच्या उप