पान:ब्रिटिश लोकांचा जीवनक्रम व चारित्र्य.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लंडनचा आसमंतात्-भाग. झाली नव्हती. ब्रिटिश साम्राज्याशी घडलेल्या संबंधाविषयी माझ्या हिंदी प्रजाबंधूच्या मनांत जी दृढभक्ति आहे, तिचें, जणों त्यांचे मुख होऊन, या महद्भाग्याच्या प्रसंगी आपणापुढे द्योतन करण्याची ही संधि मला मिळते आहे, याबद्दल मी अतिशय आभारी आहे, व याचा मला मोठा अभिमान वाटत आहे.' पुढे 'ईस्ट इंडिया असोसिएशन ' समोर " इंग्लंडानें हिंदुस्थानासाठी काय केले आहे ? " या विषयावर व्याख्यान देण्याविषयी मला निमंत्रण झाले. त्या प्रसंगी या विषयावर मी बरेच विस्तारपूर्वक भाषण केले. हे व्याख्यान वेस्टमिन्स्टरमधील कक्स्टन हॉलमध्ये ता० २३ जून रोजी देण्यात आले. त्या प्रसंगी लॉर्ड रे अध्यक्ष असण्याचा, व लॉर्ड लामिंगटन, सर जार्ज बर्डवुड, कर्नल सी. ई. येट, एम्. पी., आणि इतर मंडळी, यांच्याकडून सहानुभूति व प्रेमद्योतक चार शब्द ऐकण्याचा बहुमान मला मिळाला. त्याचा विस्तार करण्याची येथें आवश्यकता नाही. कारण, ते व्याख्यान व त्यावरील वादविवाद, स. १९१३ च्या आक्टोबरच्या 'एशियाटिक कार्टरली रिव्ह्यू' च्या अंकांत प्रसिद्ध झालेले आहेत. लंडन शहर प्रदर्शनांचे जसें मायघर. आम्ही तेथे असलेल्या मुदतीत पुष्कळशी प्रदर्शने आमच्या पाहण्यांत आली. 'अर्ल्स कोर्ट ' मध्ये 'युनायटेड सहिसेस् ' चे प्रदर्शन फारच मनोवेधक होते. लष्कर व आरमार या खात्यांविषयी लोकांमध्ये आवड ७९